Happy Mother’s Day 2021 : जाणून घ्या या दिवसाचा इतिहास , आईला दया एकदम खास शुभेच्छा

Happy Mother’s Day 2021 : जाणून घ्या या दिवसाचा इतिहास , आईला दया एकदम खास शुभेच्छा
Happy Mother’s Day 2021 : जाणून घ्या या दिवसाचा इतिहास , आईला दया एकदम खास शुभेच्छा

Happy Mother’s Day 2021 : जाणून घ्या या दिवसाचा इतिहास , आईला दया एकदम खास शुभेच्छा

‘आ’ म्हणजे आत्मा’ आणि ‘ई’ म्हणजे ‘ईश्वर’. आत्मा आणि ईश्वराचा संगम म्हणजे ‘आई’ असे कवी शांताराम नांदगावकर यांनी म्हटले आहे .

प्रत्येकाच्या आयुष्यात आई अत्यंत महत्त्वाची असते. तिच्याशिवाय आपले अस्तित्व च नाही. आपल्या आयुष्यातील तिचे स्थान अद्याप अबाधित आहे हे दाखवून देण्यासाठी एक खास दिवस साजरा केला जातो. तो म्हणजे ‘मातृदिन’ ‘Mother’s Day. Mother’s Day म्हणजेच मातृदिन जगभरातील विविध देशांमध्ये मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी साजरा केला जातो. यंदा 9 मे रोजी मातृदिन साजरा केला जाईल.

कंगणा राणौतला(Kangana Ranaut) कोरोनाची लागण,म्हणाली कल्पनाच नव्हती हे विषाणू माझ्या शरिरात पार्टी करतायेत

‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ हे आपण नेहमीच म्हणतो. खरं आहे, आई आजूबाजूला नसेल तर काहीच सुचत नाही. बाहेरून घरात आल्यानंतर सर्वात पहिली हाक मारली जाते ती आईला. सर्वात पहिले नजर शोधू लागते ती घरात आईला. जगात अशी कोणती गोष्ट आहे जी मिळत नाही,बाकी सर्व मिळू शकतं पण आई कधीच मागून मिळत नाही.

Mother’s Day History:

मदर्स डे ची सुरुवात अमेरिकेतील फिलाडेल्फिया येथे झाली. एना जार्विस यांच्या आईने मैत्री आणि नातेसंबंध वाढवण्यासाठी महिलांचा एक ग्रुप तयार केला होता. त्यांच्या मृत्यूनंतर 12 मे 1907 रोजी त्यांच्या स्मरणार्थ निमित्त तेथील चर्चमध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

JOBS In Maharashtra:आरोग्य विभागात 16 हजार पदांची भरती, 100 टक्के पदभरतीला मान्यता

हा दिवस राष्ट्रीय सुट्टी म्हणून साजरा करण्यासाठी त्यांनी मोहीमही सुरु केली. मात्र, तिची ही विनंती नाकारली गेली होती. पण, 1941 मध्ये एका प्रस्तावावर स्वाक्षरी करण्यात आली आणि हे जाहीर करण्यात आलं की आजपासून मे महिन्याचा प्रत्येक दुसरा रविवार मातृदिन म्हणून साजरा केला जाईल.

Quotes For Mother’s Day 2021 :

आपल्या आईला शुभेच्छा, गिफ्ट्स द्या खालील काही संदेशद्वारे

1. ती आहे म्हणून सारे विश्व आहे, ती आई म्हणूनच मी आहे
ती आहे म्हणूनच ही सुंदर नाती आहेत
आई तुला मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा!

2. फुलात जाई, प्रार्थनेत साई
पण जगात सगळ्यात भारी आपली आई…Happy womens day

3. आई म्हणजे स्वर्ग
आई म्हणजे सर्व काही…
कितीही जन्म घेतले तरी
तुझे ऋण फेडू शकणार नाही – Happy Mothers Day

4. हजार जन्म घेतले तरी
एका जन्माचेही ऋण फिटणार नाही
आई लाख चुका होतील माझ्याकडून
पण तुझं समजावणं कधीच मिटणार नाही – Happy Mothers Day

5. दोन शब्दात सारं आकाश सामावून घेई
मिठीत तिने घेता लहान वाटे भुई – आई तुला हॅप्पी मदर्स डे

6. दुःखाचा डोंगर असो की सुखाची बरसात
आठवते ती एकच व्यक्ती कायम जिचा हवा सहवास…अशीच ती आपली आई – Happy Mothers Day

India Post GDS Recruitment 2021:महाराष्ट्र टपाल विभागात 2400+ पदांची महाभरती,केवळ 10वी पास, कोणतीही परीक्षा नाही.

7. जगी माऊलीसारखे कोण आहे
तिचे जन्मजन्मांतरीचे ऋण आहे
असे हे ऋण ज्याचे व्याज नाही
या ऋणाविना जीवनास साज नाही

8. माझा विचार करणे जी कधीच सोडत नाही
कितीही कामात असली तरीही मला फोन करायचे विसरत नाही
कितीही चिडलो तिच्यावर तरी ती माझ्यावर चिडत नाही
म्हणून तर आई मला तुला सोडून कुठेच जावेसे वाटत नाही – Happy Mothers Day

9. उन्हामधली सावली तू
पावसातली छत्री तू
हिवाळ्यातली शाल तू
माझ्यासाठी आहेस सर्वकाही तूच – आई Happy Mothers Day

10. माझ्या आयुष्याच्या अंधारात
ती मेणबत्तीसारखी वितळत राहिली – Happy Mothers Day

11 . हंबरूनी वासराला जेव्हा चाटते गाय
तेव्हा मला त्याच्यामध्ये दिसते माझी माय – Happy Mothers Day

12 . माझ्या हृदयात एकाच व्यक्तीला अढळ स्थान आहे
आणि ती म्हणजे तू आहेस आई – Happy Mothers Day

13 . ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊचा शिवबा झाला.
आई मी भाग्यवान आहे की,
मी तुझ्या पोटी जन्म घेतला – Happy Mothers Day

14 . पूर्वजन्माची पुण्याई असावी जो जन्म तुझ्या पोटी घेतला
जग पाहिलं नव्हतं तरी नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला
– आई मातृदिनाच्या शुभेच्छा!

15.. मी कधी बोलत नाही किंवा कधी सांगत नाही.
पण आई तू या जगातील सर्वोत्तम आई आहेस

16. सगळ्यांपेक्षा वेगळी आणि सुंदर तर तू आहेसच.
पण तू माझी आहेस याचा मला अभिमान आहे – Happy Mothers Day

17 . माझ्यासाठी जिच्या मनात आणि ओठावर फक्त आशिर्वाद येतात…ती आहे माझी आई – Happy Mothers Day

18 . आज मी जे काही आहे ते फक्त आणि फक्त तुझ्या संस्कारांमुळेच. आई तुला मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा!

19 . जगात अशी कोणती गोष्ट आहे जी मिळत नाही
बाकी सर्व मिळू शकतं पण आई कधीच मागून मिळत नाही – Happy Mothers Day

20.. हजार जन्म गेले तरी,
या एका जन्माचे ऋण कधीच फिटणार नाही,
आई लाख चुका होतील माझ्याकडून,
पण तुझं समजावणं काही मिटणार नाही, मातृदिनाच्या शुभेच्छा!

21 . आई,
आमची सर्वप्रथम गुरु,
तुझ्याचपासून माझे अस्तित्व सुरु,
मातृदिनाच्या शुभेच्छा!

22. आई तुझ्या संस्कारातून
कोवळ्या रुपाचे झाले तरु,
मी कसा गं विसरेन तुला,
तुझ्याचमुळे मी झालो यशस्वी,
मातृदिनाच्या गोड शुभेच्छा!

23. . तिच्या मांडीवर डोकं ठेवून
अश्रूंना वाट मोकळी करुन द्यावीशी वाटते,
पण तिचे आलेले अश्रू आठवताच
मी मुक्याने माझे अश्रू गाळून टाकतो,
आई तुला मातृदिनाच्या शुभेच्छा

24 . आई, आभाळाएवढी
माया जिची,
ईश्वरासमान कृपा तिची,
मातृदिनाच्या शुभेच्छा!

25.. तुझ्या गर्भात नक्कीच स्वर्ग असावा
म्हणूनच वाटे तुझ्या कुशीत घ्यावा विसावा,
समस्त मातांना मातृदिनाच्या शुभेच्छा!

26 . कोठेही न मागता भरभरुन मिळालेले
दान म्हणजे ‘आई’,
विधात्याच्या कृपेचे निर्मळ वरदान म्हणजे ‘आई’
मातृदिनाच्या शुभेच्छा!

27.. देवा सुखी ठेव तिला,
जिने जन्म दिलाय मला,
आई तुला मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा!

28 . ठेच लागता माझ्या पायी,
वेदना होती तिच्या ह्रदयी,
तेहतीस कोटी देवांमध्ये,
श्रेष्ठ मला माझी आई,
मातृदिनाच्या शुभेच्छा!

29. गुतंलेले तुझे हात
नेहमीच व्यस्त असतात कामात,
तुझी अंगाई ऐकावया,
घेऊन येई रात्र,
मातृदिनाच्या शुभेच्छा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here