Happy Dussehra 2021 Wishes: विजयादशमी निमित्त खास मराठी Messages, Greatings, HD Images शेअर करून द्या शुभेच्छा

happy dussehra 2021 wishes special marathi messages greatings hd images for vijayadashami

Happy Dussehra 2021 Wishes: शुंभ, निशुंभ, रक्तबीज, महिषासुर इ. राक्षसांना मारण्यासाठी दुर्गेने चंडीचा अवतार घेतला व नऊ दिवस या राक्षसांबरोबर युद्ध केले. त्यानंतर दशमीला महिषासुराचा तिने वध करून अंतिम विजय संपादन केला.

‘दसरा’ (Dussehra 2021) हा हिंदू धर्मामधील महत्वाच्या सणांपैकी एक आहे. आश्विन शुद्ध दशमी दिवशी हा उत्सव साजरा होतो. आश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापनेला देवीचे घट बसून नवरात्राला सुरुवात होते त्यानंतर दहाव्या दिवशी विजयादशमी साजरी करण्यात येते. चांगल्याचा वाईटावर विजय, अंधारावर प्रकाशाचा विजय, या हा सणामागील अर्थ आहे.

Ganesh Chaturthi 2021 : जाणून घ्या गणपती स्थापनेचा मुहूर्त ,गणपती स्थापणेनिमित्तअशा द्या शुभेच्छा

यंदा 15 ऑक्टोबरला दसरा साजरा होणार आहे. आश्विन शुद्ध दशमीच्या दिवशी आकाशात तारका दिसू लागताच विजय नावाचा मुहूर्त असतो व त्या वेळी जे काम हाती घ्यावे त्यात यश मिळते, असे पुराणांत सांगितले आहे. त्यामुळे हा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे.

happy dussehra 2021 wishes special marathi messages greatings hd images for

शुभेच्छांची ही सोनेरी किरणे पसरो तुमच्या आयुष्यात विजया दशमीचा हा सुवर्णक्षण अखंड नांदो तुमच्या जीवनात शुभमुहूर्ताचा हा दसरा होवो आपणांस लाभाचा आपल्या जीवनात पाऊस पडो सुवर्णांचा,दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा!

झेंडुची तोरण आज लावा दारी

सुखाचे किरण येऊद्या घरी

पूर्ण होऊद्या तुमच्या सर्व इच्छा

विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

शुभेच्छांची ही सोनेरी किरणे पसरो तुमच्या आयुष्यात

विजया दशमीचा हा सुवर्णक्षण अखंड नांदो तुमच्या जीवनात

शुभमुहूर्ताचा हा दसरा होवो आपणांस लाभाचा

आपल्या जीवनात पाऊस पडो सुवर्णांचा…

दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा!

निसर्गाचे दान, आपट्याचे पान

त्याला सोन्याचा मान

तुमच्या आयुष्यात नांदो सुख-शांती समाधान

दसऱ्याच्या मनापासून शुभेच्छा!

दरम्यान, शुंभ, निशुंभ, रक्तबीज, महिषासुर इ. राक्षसांना मारण्यासाठी दुर्गेने चंडीचा अवतार घेतला व नऊ दिवस या राक्षसांबरोबर युद्ध केले. त्यानंतर दशमीला महिषासुराचा तिने वध करून अंतिम विजय संपादन केला, अशी एक आख्यायिका आहे. या दिवशी पांडवअज्ञातवास संपवून परत निघाले असेही सांगितले जाते. तसेच याच दिवशी भगवान रामाने रावणाचा वध करून सीतामाईची सुटका केली असेही पुराणात म्हटले आहे.

यादिवशी शमीची किंवा आपट्याच्या झाडाची पूजा करून सोने लुटतात. या दिवशी सीमोल्लंघन करून मराठा सरदार नव्या मोहिमेवर निघत असत. हा दिवस शुभ असल्यामुळे हिशेबाच्या वह्या, जुन्या पोथ्या, यंत्रे, शस्त्रे इ. वस्तूंचे पूजनही या दिवशी करतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here