Hanuman Jayanti 2021:हनुमान जयंतीला विशेष योगायोग, जाणून घ्या सर्व, WhatsApp Status आणि शुभेच्छा

Hanuman Jayanti 2021

आज हिंदू धर्मानुसार चैत्र महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंतीचा सण साजरा केला जातो. आज हनुमान जयंती (Hanuman Jayanti) आहे. हनुमान जी शक्ती, बुद्धिमत्ता आणि विद्येचे प्रतीक मानले जातात. या दिवशी हनुमानजीची पूजा केल्यास भक्तांचे सर्व कष्ट दूर होतात. मंगळवारी हनुमान जयंती पडत आहे.

पूजेचा शुभ काळ

पौर्णिमा तिथी आरंभ – 26 एप्रिल 2021 दुपारी 12 वाजून 44 मिनिटांपर्यंत पौर्णिमा तिथी समाप्त – 27 एप्रिल 2021 च्या रात्री 9 वाजून 1 मिनिटांपर्यंत

पूजेची पद्धत

हनुमान जयंतीनिमित्त सुंदरकांडचे पठण करणे शुभ आहे. जे लोक सुंदरकांडचं पठण करतात त्यांच्याजीवनात कोणतीही अडचण येत नाही. हा पाठ केल्यास भगवान राम यांचे आशीर्वाद मिळतात. आपण पाठ करु शकत नसाल तर नक्कीच ऐका. यानेही फायदा होईल. या विशेष दिवशी भक्त गरीबांना जेवण देतात. तसेच दान देण्याचे विशेष महत्त्व आहे.

हनुमान हा भगवान शिवांचा 11 वा अवतार आहे. हनुमानजी वेगवेगळ्या नावांनी परिचित आहेत. या दिवशी भगवान हनुमानाचा जन्म झाला होता. हनुमान जी आपले सर्व त्रास दूर करतात, म्हणूनच त्यांना संकंटमोचक म्हणून ओळखले जाते. हनुमान जयंतीच्या दिवशी संकंमोचक हनुमान मंदिरात लाल चोला अर्पण करावा. यानंतर तूप किंवा तेलाचा दिवा लावा आणि हनुमान चालीसाचे पठण करावे.

हे नक्की वाचा: CoronaVirus- भारतावर संकट! हृदय तुटले, दोनजगज्जेत्या कंपन्यांचे सीईओ मदतीला धावले

Hanuman jayanti wishes 2021

Whatsapp status:रामनवमीनंतर चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या दिवशी बजरंग बली हनुमानाचा जन्म झाला होता. भारतात या दिवशी मारूती रायाच्या मंदिरात मोठ्या भक्तीभावाने पूजा अर्चा आणि जन्मोत्सव साजरा केला जातो.

Hanuman jayanti wishes 2021

रामनवमी नंतर हनुमान जयंती येते. यंदा 27 एप्रिल 2021 रोजी हनुमान जयंती आहे. अशा या पवित्र आणि शुभ दिवशी सोशल मीडियावर स्टेटस ठेवण्यासाठी, मित्रपरिवार आणि नातेवाईकांना मेजेस आणि शुभेच्छा देण्यासाठी मारूतीरायाचे शुभेच्छा संदेश पाठवले जातात.

* जय हनुमान ज्ञान गुन सागर। जय कपीस तिहुं लोक उजागर।।

* कोटिच्या कोटि उड्डाणे, झेपावे उत्तरेकडे, मंद्राद्रीसारिखा द्रोणू, क्रोधे उत्पाटिला बळें

Hanuman jayanti wishes 2021

* लंका जाळून सीता मातेला सोडवली, रामभक्त जय जय बजरंग बली… हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

* जय जय बजरंग बली, तोड दुश्मन की नली,हॅपी हनुमान जयंती

Hanuman jayanti wishes 2021

* मुखी राम नाम जपी, योगी बलवान लंकेचा नाश करी, असा सर्वशक्तिमान, आकाशापरी मोठा, कधी मुंगीहूनी लहान, हृदयी वसती राम असा भक्त हनुमान… हनुमान जयंतीच्या शुभेच्छा

* महारूद्र अवतार हा सुर्यवंशी, अनादिनाथ पूर्ण तारावयासी, असा चैत्री पौर्णिमेचा जन्म झाला, नमस्कार माझा तया मारूती रायाला.. हनुमान जयंतीच्या शुभेच्छा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here