Maharashtra CoronaVirus update :खुशखबर ! राज्यात मे महिन्यात कोरोना चे प्रमाण होणार कमी ,टास्क फोर्स ने वर्तवले

Maharashtra CoronaVirus update

Maharashtra CoronaVirus update: राज्यात करोना (Corona)संक्रमनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे .राज्यात रुग्णांसाठी बेड्स,ऑक्सिजन यांचा तुटवडा जाणवत आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला राज्यभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढायला सुरुवात झाली होती. राज्यातील ही कोरोनाची दुसरी लाट मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पूर्णपणे ओसरेल, असे आनंदाचे भाकीत टास्क फोर्समधील डॉक्टरांनी वर्तविले आहे. . 31 एप्रिलपासून राज्यातील कोरोनाची दुसरी लाट ओसरण्यास सुरवात होऊल तसेच त्यानंतर आठवडाभराच्या कालावधीत नव्या रुग्णांची संख्या आणि मृत्यूदर दोन्हीही कमी होतील, असा टास्क फोर्समधील डॉक्टरांचा अंदाज आहे.

राज्यातील ही कोरोना ची दुसरी लाट ओसरायला लागल्यास आपल्याला वेगाने लसीकरण करावे लागेल, असेही या तज्ज्ञांनी सांगितले. त्यासाठी राज्यातील प्रत्येक लसीकरण केंद्र साधारण 12 तास सुरु राहिले पाहिजे. पहिले सहा तास वृद्ध व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींचे लसीकरण व्हावे. त्यानंतर 18 ते 45 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण व्हावे. तरच कोरोना लसीकरणाचा अपेक्षित वेग गाठता येईल, असेही ‘टास्क फोर्स’च्या डॉक्टरांनी सांगितले.

हे नक्की वाचा: Hanuman Jayanti 2021:हनुमान जयंतीला विशेष योगायोग, जाणून घ्या सर्व, WhatsApp Status आणि शुभेच्छा

राज्यातील  कोरोना संसर्गाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने कोरोना संसर्गाला आळा बसावा यासाठी राज्य सरकारने लॉकडाऊनचा घेतलेला निर्णय योग्य ठरताना दिसत आहे. राज्यात आज तब्बल 15 दिवसांनंतर नव्या कोरोनाबाधितांचा आकडा हा 50 हजारांच्या खाली आहे. एकटच्या पुणे शहरात सलग आठव्या दिवशी कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येत घट झाल्याचं बघायला मिळालं आहे .पुणे महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटरवर याबाबत समाधान व्यक्त केलं आहे.

गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात 48,700 नव्या रुग्णांची नोंद

गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात 48,700 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 524 रुग्णांचा मृत्यू झाला. तर 71,736 रुग्णांनी कोरोनावर मात केली. राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. मात्र दुसरीकडे कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ सुरू असल्याचे दिलासादायक चित्र समोर आले आहे. गेल्या सहा दिवसांत राज्यभरात 4 लाख 42 हजार 466 रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here