Atarangi Re Trailer:अतरंगी रे’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित या चित्रपटात अक्षय कुमार, धनुष आणि सारा अली खान मुख्य भूमिकेत दिसत आहेत.

first look release of atarangi re movie

अभिनेता अक्षय कुमार ( Akshay Kumar)सारा अली खान आणि धनुषचा अतरंगी रे’( Atarangi Re’)चित्रपट चर्चेत आहे. काल या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. ते पाहून चाहत्यांमध्ये चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अशातच आता चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला

असून सोशल मीडियावर चर्चेत आहे. ‘अतरंगी रे’ चित्रपटाच्या ३ मिनिटे आठ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये सारा आणि धनुषने अनेकांची मने जिंकली आहेत.ट्रेलरच्या सुरुवातीला धनुषचे अपहरण करुन साराशी लग्न करण्यासाठी आणण्यात आल्याचे दाखवले आहे. पण सारा लग्नाला तयार नसते.

कुटुंबीय जबदरस्तीने साराचे लग्न धनुषशी लावून देतात. त्यानंतर सारा आणि धनुष दिल्लीला जातात. तेव्हा त्यांच्यामध्ये जवळीक निर्माण होते आणि त्याच वेळी अक्षय कुमारची एण्ट्री होते. साराचे अक्षयवर प्रचंड प्रेम असते. एकंदरीत ट्रेलर पाहता चाहत्यांमध्ये चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.

व्हिडीओमधून समजते आहे की सारा अली खानचे (Sara Ali Khan)नाव रिंकू आहे, जी प्रेमात वेडी आहे. तर धनुष (Dhanush) चित्रपटात विशूच्या भूमिकेत दिसणार आहे. सारा अली खानने अक्षय कुमारचे मोशन पोस्टर शेअर करून लिहिले की, प्रत्येकवेळी अतरंगी स्टाईलमध्ये एंट्री करतात.

Big Boss Marathi 3 : बिग बॉस मराठीचा धमाका आजपासून सुरू, पहा कसे असेल यंदाचे पर्व

त्यांची ताकद आणि प्रेम बघून सर्वजण पराभूत होतात. तर अभिनेता धनुषचे पोस्टर शेअर करताना ती म्हणाली, ‘विशूला भेटा, हे चित्रपटातील आमचे पहिले पात्र आहे. जे इतर कोणी करू शकले नसते’. तसेच अक्षय कुमारने सारा अली खानचे मोशन पोस्टर शेअर केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here