Fire Bike : आग विझवणारी ‘फायर बाइक’ येणार अग्निशमन दलाच्या ताफ्यात,सोपे होणार गल्लीबोळीतील आग विझवणे

Fire Bike : आग विझवणारी ‘फायर बाइक’ येणार अग्निशमन दलाच्या ताफ्यात,सोपे होणार गल्लीबोळीतील आग विझवणे

Fire Bike : अग्निशमन दलाच्या ताफ्यात आता फायर बाईक(Fire Bike) उपलब्ध होणार आहेत. या बाईक गल्लीबोळातील आगीच्या ठिकाणी पोहचून आग विझवणार आहेत. मुंबई पालिकेच्या २४ वॉर्डमधील फायर स्टेशनमध्ये(Fire Bike In Fire Station Of Mumbai) प्रत्येकी एक बाइक ठेवली जाणार असल्याची माहिती अग्निशमन दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.पालिका एका बाइकसाठी सुमारे १३ लाख रुपये खर्च करणार आहे.

४० लिटर पाणी, पोर्टेबल फायर सिस्टीम, कम्युनिकेशन सिस्टीम, ३० मीटर होजरील पाइप, फायर पंप, फायर एक्सटिंग्युशर अशी यंत्रणा असणार आहे.

शहरात लोकवस्ती दाटीवाटीची असल्याने दलाच्या गाड्या आगीच्या ठिकाणी पोहचण्यास अडचणी निर्माण होतात. त्यामुळे आगीची तीव्रता वाढत जाते.गल्लीबोळातील आग वेगाने विझवण्यासाठी अग्निशमन दलात हायटेक फायर बाइक आणण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.

Tesla Share Price: टेस्लाने $1 ट्रिलियन बाजारमूल्य ओलांडले,जाणून घ्या बरेच काही

परिणामी दुर्घटनेच्या तिव्रतेनुसार आवश्यक यंत्रणा वेगाने उपलब्ध करणे शक्य होणार आहे. आगीची माहिती मिळताच ही तात्काळ फायर बाइक घटनास्थळी पोहचेल. आगीचा भडका उडालेल्या ठिकाणीच छोट्या प्रमाणात आग असताना विझवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. तसेच मोठ्या बंबांच्या गाड्यांपेक्षा आगीच्या ठिकाणी लवकर पोहोचल्याने संभाव्य दुर्घटनेची तिव्रताही समजणे शक्य होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here