Facebook Name Change : फेसबुकने नाव बदललं, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आता ‘मेटा’ फेसबुकच्या पॅरेंट कंपनीचे नाव

Facebook name change

Facebook Name Change : फेसबुकने आपल्या कंपनीचे नाव बदलून ‘मेटा’ केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून फेसबुक नवीन नावाने रिब्रड करण्याचा विचार करत असल्याच्या बातम्या येत होत्या. अखेर फेसबुकने कंपनीचं नाव बदललं आहे. पण असं असलं तरी फेसबुकच्या मालकीच्या स्वतंत्र प्लॅटफॉर्मची नावे कायम राहणार आहेत.

कंपनी केवळ सोशल मीडिया कंपनीपासून “मेटाव्हर्स कंपनी” बनणार आहे आणि “एम्बेडेड इंटरनेट” वर काम करेल, जे वास्तविक आणि आभासी जग एकत्र करेल, असं फेसबुकचे(Facebook) मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मार्क झुकेरबर्ग(Mark Zuckerberg)यांनी जाहीर केले आहे.

Fire Bike : आग विझवणारी ‘फायर बाइक’ येणार अग्निशमन दलाच्या ताफ्यात,सोपे होणार गल्लीबोळीतील आग विझवणे

2005 ला ही कंपनीने नाव बदललं होतं फेसबुकचे माजी सिविक इंटिग्रिटी चीफ समिध चक्रवर्ती यांनी कंपनीला ‘मेटा’ हे नाव सुचवले होते. यापूर्वी फेसबुकने 2005 मध्ये असेच काही केले होते, जेव्हा त्याने आपले नाव The Facebook वरून Facebook असे बदलले होते.

जगभरात 3 अब्जाहून अधिक लोक फेसबुक वापरतात. त्याचवेळी, भारतात फेसबुक वापरणाऱ्यांची संख्या 41 कोटी आहे. फेसबुक आणि इतर मोठ्या कंपन्यांसाठी ‘मेटाव्हर्स’ ही संकल्पना उत्साहवर्धक आहे कारण ती नवीन बाजारपेठा, नवीन प्रकारचे सोशल नेटवर्क्स, नवीन ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स आणि नवीन पेटंटसाठी संधी निर्माण करेल, अशा मार्केटमध्ये आशा आहेत.

कंपनीने नाव जाहीर करताना मेटाव्हर्सची नेमकी काय असेल आणि ती प्रत्यक्षात कशी आणली जाईल याची योजना देखील सगळ्यांसमोर मांडली आहे. मेटाव्हर्स हे एक पूर्णतः ऑनलाईन विश्व असेल ज्या ठिकाणी व्हर्युअल वातावरणात आपल्याला ऑनलाईन गेम्स खेळता येऊ शकतील, काम करता येऊ शकेल त्याच बरोबर संभाषण देखील साधता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here