वृद्ध पत्नीला मारहाण प्रकरण, गजानन बुवाला (Gajanan Buwa)ठोकल्या बेड्या

Eventually Gajanan Buwa Was Arrested By The Police

कल्याण तालुक्यातील मलंगपट्टयातील द्वारली गावातील चिकणकरचा बुवाचा वयोवृध्द पत्नीला बेदम मारहाण करीत असल्याचा व्हिडीओ त्यांच्या नऊ वर्षाच्या नातवाने शूट करीत व्हायरल केला होता.

वयोवृद्ध नागरिकाकडून आपल्या पत्नीला लाथाबुक्क्या आणि बादलीने मारहाण करत असल्याचा संतपाजनक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा प्रकार कल्याण मलंगगड जवळील द्वारली गावातील हद्दीत घडला होता.

गजानन बुवा चिकणकर, ( Gajanan Buwa )असे त्या वृद्धाचे नाव आहे. त्याने वृद्ध पत्नीला केलेली अमानुष मारहाण पाहून संताप व्यक्त केला जात होता. दरम्यान पोलिसांनी गजानन बुवाला बेड्या ठोकल्या आहेत. हिललाईन पोलिसांनी सु मोटोने गुन्हा दाखल केला आहे.

पाण्याच्या वादातून वृद्धाने आपल्या पत्नीला जाब विचारत बादलीने तसंच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती. महिला वारंवार मला मारु नका, अशी विनंती

PM Modi Live Speech : 18 वर्षांवरील सर्व लोकांना मोफत लस, मोदी ने केले जाहीर

करत होती. मात्र गजानन बुवा अमानुषपणे मारहाण करत होता. घरात इतर महिलाही काम करत होत्या. दरम्यान, कोणीही मध्यस्थी करत मदतीसाठी येत नव्हते, असे व्हायरल झालेल्या व्हिडीओ वरून दिसते. तर वृद्ध महिलेच्या नातवाने हा व्हिडीओ रेकॉर्ड करत आजोबांकडून होणारी अमानुष मारहाण कॅमेऱ्यात कैद केली होती. नातवाने उघड केला आजोबांचा आजीला होणारी मारहाण कॅमेऱ्यात कैद करुन व्हिडीओ केला व्हायरल व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी घटनेची दखल घेत घटनास्थळ गाठलं होतं.

यावेळी गजानन बुवा चिकणकर वारीसाठी आळंदीला गेले असल्याचं कुटुंबाने सांगितलं. दरम्यान याप्रकरणी त्यांच्या पत्नीने पोलिसांत कोणतीही तक्रार दिलेली नाही. पोलिसांनी कुटुंबाला समज दिली होती. मात्र मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर गजानन बुवा याच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी वाढली.त्यानंतर पोलिसांनी आरोपी गजानन बुवा चिकणकर याला बेड्या ठोकल्या आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here