aaplamaharashtra

Driving Licence 2023

Driving Licence गाडी चालवताना कोणती कागदपत्रे सोबत पाहिजे ? Driving Licence वाहतुकीचे नियम मोडले की काय दंड होतो? आपल्या गाडी चालवता येते फक्त एवढेच महत्वाच नसत, तर त्यासोबत वाहतुकीचे नियम देखील माहित हवे. जेणे करून तुम्हाला गाडी रस्त्यावर चालवताना ट्रैफिक पोलिसांची भीती वाटणार नाहि आणि बिनधास्त पणे गाडी चालवू शकता तर आज आपण वाहतुकीचे नियम, कोणते कागद पत्र लागतात. नियम नाही पाळे तर शिक्षा काय होते, ट्रफिक नियमांबद्दल गैर समज, मोटर वाहन नियमामध्ये झालेले बदल हे सर्व माहित तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून देणार आहोत.

मोटार वाहन अधिनियमात सुधारणा झाल्यापासून दंडाच्या रकमेत खुप प्रमाणात वाढ झाली आहे त्यामुळे गाडी चालवताना योग्य ती कागदपत्र बाळगणे महत्त्वाचे आहेत. कोणती कोणती कागदपत्र जवळ असली पाहिजे.

आपला महाराष्ट्र करू मी एक वेब साइड ओपन केली आहे त्या मधे सरकारी नौकरी, योजना अजुन खुप महिती या वेब साइड ला भेटनार आहे आपल्या समाजाला महिती भेटावी म्हनुन उघडे केल आहे Whatsapp Group ची लिंक दिली आहे.

https://chat.whatsapp.com/FDEIU5lI0XhIleB4HJauZ1

1) Driving Licence (ड्रायव्हिंग लायसन्स)

Driving Licence

आपण जेव्हा वाहन चालवतो .त्यावेळी सगळ्यात महत्त्वाच असते ड्रायव्हिंग लायसन्स त्याशिवाय गाडी चालवता येत नाही ड्रायव्हिंग लायसन्स काढतो तेव्हा आपल्याला अगोदर लर्निंग लायसन्स आणि मग ड्रायकिंग’ मिळते. ड्रायकिंग लायसन्स ची मुदत 20 वर्षांसाठी असते आणि नंतर दहा-दहा वर्षानी Renewal करावे लागत लायसन्स काढण्यासाठी परीक्षा द्यावी लागते त्या परीक्षेत पास झाल्यावर लायन्स मिळते लायसन्स हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास पोलिसांमध्ये तक्रार करावी लागते. जेव्हा तुम्ही लायसन्स साठी पुन्हा अर्ज करता तेव्हा त्या तकार FIR ची कॉपी लागते.लायसन्स हे खुप महत्त्यांच कागदपत्र आहे तुमच्याकडून चुकून अपघात झाला तर पोलिस सर्वात अगोदर तुम्हाला लायसन्स मागतात मोटार वाहन अधिनिराम कायदयानुसार बिना लायसन्स गाडी चालवताना भेटल्यास 5000 रुपये दंड आहे.भारताचं लायसन्स हे ऑस्ट्रेलिया, अमेरिका, स्वीडन, जर्मनी, भूतान, कॅनडा, न्यूझीलंड, फ्रान्स, युके, स्विझर्लंड, दक्षिण आफ्रिका आणि मलेशिया या देशात स्वीकारले जाते.

2) Car registration certificate गाडीच नोंदणी प्रमाणपत्र

Driving Licence सारखचं गाडीचं नोंदणी प्रमाणपत्र असत त्याला गाडीचे पेपर असे देखील म्हणतात तुमच्या गाडीचे राज्यात नोंदणी झाले आहे याचं ते प्रमाणपत्र असते ते असणे अतिशय महत्त्वाच आहे हे प्रमाणपत्र नसेल तर 10,000 दंड आणि 6 महिने तुरुंगवास शिक्षा भेटते आणि जर हा गुन्हा पुन्हा केला तर 15,000 रुपये दंड आणि 2 वर्षे तुरुंगवास होऊ शकतो.

3) Insurance (इन्शुरन्स)

Driving Licence आणि गाडीचे पेपर सोबत तुम्हाला गाडीचा इन्शुरन्स पण महत्त्वाच आहे. जर पोलिसांनी पकडल तर ते गाडीचे इन्शुरन्स नसेल तर लायसन्स रद्द होऊ शकते. इन्शुरन्स नसेल 2000 रूपये दंड तीन महिन्याची तुरुंगवास आणि समाज सेवा करायची अशी शिक्षा होऊ शकते त्यामुळे गाडीच इन्शुरन्स असणे महत्वाच आहे.

4) PUC

पेट्रोल पंप किंवा रोड पर डिक्की उघडी असलेली व्हॅन असते. हे Pollution Under Control म्हणजे PUC हे सर्टिफिकेट देणारी गाडी रस्त्यावर उभी असलेली व्हॅन तुम्ही अनेक वेळा बघितली असेल. गाड्यांमुळे होणारे प्रदुषण तुमच्या हा सरकार समोर महत्त्वाचा विषय आहे. तुमच्या कडे दुचाकी तीन चाकी किंवा चार चाकी चालवत असेल तर puc असन महत्त्वाच आहे. तुमची गाडी किती कार्बन उत्सर्जन करते हे जाणून घेण्यासाठी हे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

5) Identification card (ओळखपत्र)

हे खर तर महत्त्वाच नाही पण आपात्कालीन परिस्थिती मध्ये पोलिसांना काळाव की गाडी कोण चालवत आहे. या साठी आधार कार्ड किंवा पैन कार्ड सोबत असण चांगल. (Driving Licence)

महत्वाचे नियम जो पाळले नाही तर शिक्षा होती

वाहतुकीचे बरेच नियम आपल्याला माहित असतात. तरी असे काय नियम आहे ज्याची फार चर्चा होत नाही पण जर ते पाळले नाही तर शिक्षा होते. गाडी पार्क करताना रस्ता अडवून ठेवला तर दंड होतो कोलकत्ता आणि चेन्नई या शहरात तुम्ही गाडीच्या आत प्रथमोपचार पेटी ठेवली नाही तर दंड होतो गाडीला सायलेन्सर नसेल तर 500 किंवा 1000 रुपयांचा दंड होऊ शकतो. (Driving Licence)

ट्रैफिक नियमा बद्दल गैरसमज

भारतात गंमतीने म्हटल जात की भारतात वाहतुकीचे नियम तोडण्यासाठीच असतात. ते अजिबात खर नाही याच अशा नियमांबद्दल अनेक गैरसमज आहेत, ते बघु बरेचदा रात्री दहा च्या नंतर रस्त्यावर सिग्नल लागलेला असेल तरी सुद्धा चारी बजुला नजर टाकुन आपण गाडी वेगाने घेऊन जातो यामुळे अनेक वेळा अपघातही होतात. असे करणे चुकीचे आहे दिवस असो की किंवा रात्र सिग्नल पाळण गरजेच किंवा बंधनकारक आहे वन वे रोड वर गाडी मागे घेण हा सु सुद्धा गुन्हा आहे ओव्हरटेक करण हे भारतीय लोकांचा खुप आवडता उदयोग आहे उजव्या बाजूनेच ओकरटेक करावे असा आपला समज असतो मात्र तस नाही तुम्ही दारू पिलात आणी जेवण केल ‘तर गाडी चालवायला परवानगी असते असा काही जणांन वाटत मात्र असा कोणताही नियम नाही. दरु पिऊन गाडी चालवू नये हाच नियम आहे. (Driving Licence)

मोटर वाहन नियमा मध्ये बदल

मोटार वाहन अधिनियम हा कायदा 1988 सालचा आहे. केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांनी या अधिनियमात बदल आणनारे विधेय 2019 आणल या मध्ये वाहतुकीच्या नियमात बदल करण्यात नियमात आलेले आहे या कायद्यातील नव्या तरतुदींमुळं वाहन नियम तोडल्यास होणाऱ्या शिक्षा आणि दंडाच्या रकमेत मोठी वाढ करण्यात आली आहे. वाहतूक नियम मोडल्यास अधिकचा दंड ठोठावण्याचा निर्णय केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी लोकांच्या कल्याणासाठीच घेतला आहे. दंडाच्या रकमेत वाढ झाल्यानं अपघात कमी होतील. कारण लोक वाहन चालवताना अधिक सतर्क राहतील. शिवाय, सध्याच्या दंड हे जवळपास दशकभर जुने होते, त्यामुळं त्यात बदल करणंही आवश्यक होतंच.”

चारचाकी गाडी चालवताना सीट बेल्ट लावला नसल्यास अगोधर 100 रुपये दंड होता बढ़ा आता हा दंड वाढवून 1000 रुपये इतका करण्यात आलाय आलेला आहेदुचाकी चालवताना हेल्मेट नसल्यास अगोधर 100 रुपये दंड होता पण आता 1000 रुपये इतका करण्यास आलेला आहे. (Driving Licence)

ऍम्ब्युलन्ससारख्या आपत्कालीन वाहनांचा रस्ता अडवल्यास 10 हजार रूपये किंवा त्याहून दंड किंवा तीन महिन्यांचा तुरुंगवासाची शिक्षा होईल किंवा या दोन्ही शिक्षाही ठोठावल्या जातील. याआधी या गुन्ह्यासाठी कोणतीही शिक्षा नव्हती.वाहन चालवताना परवाना नसल्यास पाच हजार रुपये किंवा त्यापेक्षा अधिक दंड किंवा तीन महिन्यांची तुरुंगाची शिक्षा किंवा दोन्ही शिक्षा दिल्या जातील.हाच गुन्हा पुन्हा एकदा केल्यास दहा हजार रुपये किंवा त्याहून अधिक दंड किंवा एका वर्षाची शिक्षा किंवा दोन्ही शिक्षा दिल्या जातील.

परवाना रद्द झाला असेल आणि तरीही वाहन चालवल्यास दहा हजार रुपये किंवा त्याहून अधिक दंड किंवा तीन महिन्यांचा तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा दिल्या जातील.भर वेगाने गाडी चालवल्यास पाच हजार रुपये किंवा त्यापेक्षा अधिक दंड किंवा तीन महिन्यांचा तुरंगवास किंवा दोन्ही शिक्षा दिल्या जातील.अल्पवयीन व्यक्तीने गुन्हा केला असला तरी वाहन मालकाला दोषी ठरवलं जाईल आणि 25 हजार रुपये दंड त्याचबरोबर तीन वर्षांचा तुरुंगवास दिला जाईल. गाडीची नोंदणी ही एका वर्षासाठी रद्द केली जाईल.

मद्यपानाच्या धुंदीत वाहन चालवल्यास दहा हजार रुपये किंवा त्यापेक्षा अधिक दंड किंवा 6 महिन्यांचा तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा दिल्या जातील. मात्र हाच गुन्हा पुन्हा केला तर पंधरा हजार रुपये किंवा त्याहून अधिक दंड किंवा दोन वर्षांचा तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा दिल्या जातील.वाहन चालवताना सिग्नल तोडला तर 500 ते 10000 रुपयांपर्यंत दंड किंवा 6 ते 12 महिने तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा दिल्या जातील. मात्र हाच गुन्हा पुन्हा केल्यावर 1000 रुपयांपर्यंत दंड किंवा दोन वर्षांचा तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा दिल्या जातील.जोर जोरात हॉर्न वाजवल्यास पहिल्यांदा 1000 रुपयांचा दंड आणि पुन्हा हाच गुन्हा केल्यास 2,000 रुपयांपर्यंतचा दंड आकारला जाईल. याआधी यासाठी शिक्षेची कोणतीही तरतूद नव्हती.

वाहनाला विमा संरक्षण नसल्यास दोन हजार रुपये इतका दंड किंवा तीन महिन्यांचा तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा दिल्या जातील मात्र हाच गुन्हा पुन्हा केल्यास 4000 रुपये इतका दंड किंवा तीन महिन्यांचा तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा दिल्या जातील.मोबाईलवर बोलत वाहन चालवल्यास किंवा रस्त्याच्या विरुद्ध दिशेने वाहन चालवल्यास किंवा चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेकिंग केल्यास 1000 ते 5000 रुपयांपर्यंत दंड किंवा सहा ते बारा महिने तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा दिल्या जातील. हाच गुन्हा पुन्हा केल्यावर दहा हजार रुपयांपर्यंत दंड किंवा दोन वर्षांचा तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा दिल्या जातील.आता राज्यातील कोणत्याही आरटीओ मध्ये वाहन परवान्यासाठी अर्ज आणि वाहन नोंदणी करता येईल. तसेच वर्षभरात कधीही वाहन परवान्याचे नूतनीकरण करायचे असल्यास करू शकता. याआधी वाहन परवान्याचे नूतनीकरण एक महिन्याच्या आत करणे बंधनकारक होते.रस्त्यावर अपघात झाल्यास पहिल्या तासात ज्याला गोल्डन आवर असे म्हणतात या काळामध्ये कॅशलेस पद्धतीने उपचार करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. या काळामध्ये उपचार न मिळाल्याने अनेक व्यक्ती मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर ही सुधारणा करण्यात आली आहे. तसंच थर्ड पार्टी इन्शुरन्स अंतर्गत लवकरात लवकर भरपाई देण्याच्या दृष्टीने पावलं टाकण्याचंही सरकारनं सांगितलं आहे.मोटर व्हेइकल एक्सीडेंट फंड स्थापन करण्याची तरतूद सरकारने आणली आहे. रस्त्यावर गाडी चालवणाऱ्या सर्वांना या फंडातून विमा देण्याची तरतूद करण्यात आली आहे.हा फंड रस्ते अपघात झाल्यावर गोल्डन अवर मध्ये उपचार होण्यासाठी वापरला जाणार आहे. तसंच हिट अँड रनमध्ये जीव गमावलेल्या लोकांना त्यातून पैसे मिळावेत अशी तरतूद देखील केली आहे.जर एखादी गाडी बिघडली असेल, तर सर्व गाड्या परत करण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे. तसेच त्या गाडीच्या बदल्यात दुसरी गाडी देणं कंपन्यांना बंधनकारक करण्यात आले आहे.

या सुधारणेत दंडाच्या रकमेत प्रचंड प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. दारू पिऊन गाडी चालवण्याचा दंड अगोदर दोन हजार रुपये होता आणि आता तो दहा हजार रुपये इतका करण्यात आला आहे. गाड्या तयार करणाऱ्या कंपन्याने गाड्यांच्या दर्जामध्ये तडजोड केली तर त्यांना शंभर कोटी रुपयांचा दंड आणि एक वर्ष तुरुंगवासाची शिक्षा करण्याची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे. कंत्राटदारांनी रस्ते तयार करण्यात कुचराई ही केली तर त्यांना एक लाख रुपयांपर्यंतचा दंड आकारण्यात येईल.

https://aaplamaharashtra.com/dr-babasaheb-ambedkar-1926

Exit mobile version