Dr babasaheb ambedkar 1926

Dr babasaheb ambedkar 1926 गेल्या शतकाच्या पूर्वार्धात पुण्यातल्या Dr babasaheb ambedkar 1926 कोर्टात असा एक खटला लढला गेला होता. त्यामध्ये ब्राम्हणेतर चळवळीचे नेते केशवराव जेधे आणि दिनकरराव जवळकर हे दोघे आरोपीच्या पिंजयात होते. आणि हा खटला भरवला होता विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या पुतण्याने या खटल्यात चिपळूणकरांच्या बाजून वकील लक्ष्मण बळवंत भोपटकर होते तर जेथे जवळकरांच्या बाजून वकील डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते हा जो खटला ज्या प्रकरणावरून लढला गेला. ते प्रकरण होत देशाचे दुश्मन या एका पुस्तकावरून जेधे – जवळकरांना यांना शिक्षा झाली आणि मग ते निर्दोष सुटले हे प्रकरण सविस्तर जाऊनन घेऊ.

Dr babasaheb ambedkar

आपला महाराष्ट्र न्यूज वेबसाईटवर आपले स्वागत आहे. आम्‍ही तुम्‍हाला सर्वोत्‍तम महाराष्ट्रच्‍या बातम्या देण्‍यासाठी समर्पित आहोत आणि विश्‍वासार्हता आणि संपूर्ण महाराष्ट्र तपशील यावर लक्ष केंद्रित करत आहोत.

https://chat.whatsapp.com/FDEIU5lI0XhIleB4HJauZ1

(Dr babasaheb ambedkar) देशाचे दुश्मनची बिज फुल्यांच्या पुतळ्यात?

mahatma jyotiba phule

महात्मा फुलेंच्या निधनानंतर टिळकपक्षीयांचा महात्मा फुले बद्दलचा राग वारंवार कुठल्या ना कुठल्या मार्गाने दिसून येत होता. कधी महात्मा फुल्यांना ख्रिस्त सेवक म्हणण्यान तर कधी फुल्यांच्या कार्यावर प्रश्न उपस्थित करून अश्या सगळ्या गोष्टीवर ब्राह्मणेतर चळवळीत नाराजीचा आणि संतापाचा सूर उमटत होता जुलै 1925 दिनककराव जवळकर हे ब्राह्मणेतर चळवळीतले नेते होते त्यांनी ‘देशाचे दुश्मन’ हे पुस्तक लिहिल. हे पुस्तक टिळक पक्षीयांना तिखट उत्तर होतं. माग पुढच्या अनेक वर्षाच्या वादाला तोंड फोडणार होत या पुस्तकांतून जवळकरांनी लोकमान्य टिळक आणि विष्णुशास्त्री चिपडणूकर यांच्यावर अत्यंत कठोर शब्दात आणि तिखट शब्दात टिका केल्या होत्या हे ज्या संतापातून हे पुस्तक लिहल होत. त्या संतापाला आगीच रूप देण्याची घटना तीन ते चार महिने आधीच पुणे नगरपालिकेत घडली होती. (Dr babasaheb ambedkar)

1925 साली केशवराव जेधे हे पुणे नगरपालिके मध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले तेव्हा त्यांनी महात्मा फुले यांचा पुतळा उभारण्याचा ठराव मांडला या ठरावाला टिळक पक्षीयांनी कडाडून विरोध केला फुल्यांबद्दल वापरण्यात आलेले शब्द आणि त्यांच्या पुतळ्याला केलेला विरोध हा केशवराव जेधे यांच्या जिव्हारी लागला त्या काळात पुण्यातला जेथे मॅन्शनमध्ये ब्राम्हणेतर चळवळीचे नेते जमत असत. तिथं दिनकरराव जवळकर हे वयाने तरुण मात्र लेखनी आणि वाणी अत्यंत अतिशय धडाडीचा नेते असत या पुस्तकात अत्यंत तिखट भाषेत टिळक आणि चिपळूणकरांवर टीका केली पुण्यात राहून थेट टिळक चिपळूणकरांचाच देशाचे दुश्मन हे पुस्तक लिहायच धाडस जेधे आणि जवळकरांनी केले ( या पुस्तकाच्या वादाने कोर्टाची पायरी चढली. देशाचे दुश्मत पुस्तकाचे प्रकाशक केशवराव जेथे होते.

प्रबोधनकारांचा खुलासा

केशव सीताराम ठाकरे ऊर्फ प्रबोधनकार ठाकरे हे तेव्हा पुण्यामध्ये राहत होते आणि तिथूनच ‘प्रोधन’ नावाच साप्ताहिक चालवत या साप्ताहिकामुळेच पुढे ते महाराष्ट्रासाठी प्रबोधनकार बनले. ठाकरे आणि जवळकर या दोघांमध्ये ही अनेक साम्यस्थळ होती प्रबोधनकारांप्रमाणे जवळ करही कोकणस्थ पेशव्यांवर कडाडून टिका करत आणि कायस्थ प्रभुच कौतुक करत, आणि व ठाकरे आणि जवळकर हे दोघे ही. राम गणेश गडकरीच्या भाषेचे प्रसंशक होते त्याचमुळे की काय देशाचे दुश्मन प्रकाशित झाल्यानंतर पुस्तकावर लेखक दिनकर शंकर जवळकर यांचं नाव असल तरी खुप जणांला वाटल देशाचे दुश्यम हे पुस्तक प्रबोधनकार ठाकरेंनी लिहिल, स्वतः भालाकार भोपटकर आणि टिळकांच्या वारसांनाही असेच वाटल अखेर प्रबोधनकार ठाकरेंनी ‘ज्ञानप्रकाश मध्ये पत्र लिहून देशाचे दुश्मन पुस्तक आपण लिहित नसल्याचा उघड केले.

कुणाचा पाठिंबा, कुणाचा विरोध

केशव सीताराम ठाकरे. उर्फ प्रबोधकार ठाकरे जेधे – जवळकर यांच जाहीर कौतुक केल तर विजयी मराठा कार श्रीपतराव शिंदेनी ही जेधे जवळकरांचे आभार मानले मुकुंदराव पाटील यांनी नेहमीच जेधे – जवळकरांच्या टिकेतल्या भाषेबद्दल नापसंती व्यक्त केली होती तर जागृतीकर्ते पाळेकरांनाही टीका रुचणारी नव्हती सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष म्हणून भास्कराव जाधव यांनी तर जेधे-जवळकर यांची प्रचार करण्याची पध्दत आवडत नसल्याच टाईम्स ऑफ इंडिया मध्ये मुलाखतीत सांगितलं

कोर्टात केस दाखल झाली.

विष्णुशास्त्री चिपळूणकरांचे चुलत पुतणे कृष्णराव चिपळणकर यांनी देशाचे दुश्मन पुस्तकाचे लेखक दिनकरराव जवळकर प्रकाशक केशवराव जेथे, प्रस्तावना लेखक केशवराव बागडे आठी मुद्रक रामचंद्र लाड यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. चिपळणकरांच्या बाजूने लक्ष्मण बळवंत भोपटकर हे वकील म्हणून उभे होते. त्यावेळी प्रसिद्ध, हुशार वकील मानले जायचे. भालाकार, भोपटकरांचे हे भाऊ होते टिळक आणि चिपळूणकरांसाठी या पुस्तकात वापरण्यांत आलेले शब्द म्हणजे गिधाडे नीच, गाढवाचं पोर, कुत्रा, असे अनेक शब्द आक्षेपार्ह असल्याचे वकिल भोपटकरांनी कोर्टात सांगून टिळक – चिपळूणकरांची बदनामी झाली हे सिद्ध केले.

शिक्षा, दंड आणि दंड

देशाचे दुश्मन पुस्तकांचा खटला 9 महिने चालला 15 सप्टेंबर 1926 रोजी निकाल दिला पुस्तकाचे लेखक दिनकरराव जवळकर प्रस्तावना लिहिणारे केशवराव जेधे आणि बांगडे तसेच मुद्रक लाड यांना दोषी ठरवण्यात आले. बागडे आणि जेधे यांना इंडियन पिनल ल कलम 500 व 109 अन्वये शिक्षा देण्यात आली तर जवळकर आणि लाड यांना 500, अन्वये शिक्षा देण्यात आली बागडे आणि जेधे यांना प्रत्येक 6 महिने कैद आणि 100 रुपये दंड (दंड न दिल्यास दोन महिने कैद) जवळकर आणि लाड यांना प्रत्येकी एक वर्ष साधी कैद आणि 250 रुपये दंड (दंड न दिल्यास 3 महिने कैद) अशी शिक्षा देण्यात आली या सुनावणी नंतर यांना तुरूंगात नेण्यात आले शिक्षा कमी करण्यासाठी किंवा निर्दोष बाहेर येण्यासाठी अपिलात जाण . आवश्यक होत आणि भोपटकरां सारख्या हुशार वकिलांसमोर कुणी दुसरा वकील उभ राहण्याच धाडस करत नव्हते आणि इथेच आंबेडकर जेधे – जवळकरचे वकिल म्हणून येतात

Babasaheb Ambedakar यांची एन्ट्री भग निर्दोष सुटका.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr babasaheb ambedkar) यांनी बॅरिस्टरची प्रॅक्टिस सुरू केल्यानंतर तीन वर्षाच्या आत त्यांना दोन महत्त्वाच्या खटल्याशी संबंध आला त्यातील पहिला खटला देशाचे दुश्मन या पुस्तकावरचा होता (Dr babasaheb ambedkar) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हे पुस्तक खुप अगोदरच वाचले होते ‘It is a good book written in a bad taste’ असे शब्द डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी काडले जेव्हा जेधे जवळकर यांच्यासोबत इतर मंडळी आंबेडकर (Dr babasaheb ambedkar) यांना भेटायला आले तेव्हा आंबेडकर यांनी त्याला मोलाचा सल्ला दिला. “कायदयाच्या काटेरी कुंपणात राहून आपणाला आपली चळवळ चालविली पाहिजे कायदयाच्या गांधील माशा उठवून त्यांच्याशी झुंज देण्यात आपण आपली ताकत खर्च नये.” मात्र ब्राम्हणेतर चळवळीतल्या या तरुण नेत्यांच्या पाठीशी आपण उभ राहिलं पाहिजे असा विचार करून ऑक्टोबर 1926 मध्ये आंबेडकर(Dr babasaheb ambedkar) पुण्यात आले आंबेडकरांनी (Dr babasaheb ambedkar) पुणे सेशन्स कोर्टाल न्या. लॉरेन्स यांच्या समोर देशाचे दुश्मन पुस्तकाच्या लेखका सह चौघांच्याही शिक्षेला आव्हान दिले या अगोदर बदनामीकारक लेखनाच्याच एका खटल्यात न्या. फ्लेमिंग यांनी विसंगत निर्णय दिला होता. तक्रार नोंदवणारी व्यक्ती दूरचा नातेवाईक असल्यान तक्रार नोंदवता येणार नाही असा निर्णय दिला होता या निकालाचा नीट पणे अभ्यास करून आंबेडकरांनी (Dr babasaheb ambedkar) त्या आधारे युक्तीवाद केला आंबेडकरांचा हा युक्तीवाद कोर्टाला अमान्य करता आला नाही भोपटकरांसारखे हुशार वकील पठा काय करू शकले नाही’ जेधे, जवळकर, बागडे आणि लाड यांना निर्दोष सुटका देण्यात आली. आंबेडकरांना (Dr babasaheb ambedkar) पुढे विविध प्रसंगी ब्राम्हणेतर चळवळीतल्या नेत्यांनी पाठिंबा दिला असे दिसून येते (Dr babasaheb ambedkar)

अण्णाभाऊ साठे उर्फ तुकाराम भाऊराव साठे. अण्णाभाऊ साठे anna bhau sathe यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी झाला. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे झाला. अण्णाभाऊ साठे anna bhau sathe हे हिंदू धर्मामधल्या मांग जाती मध्ये जन्मलेले होते

.https://aaplamaharashtra.com/anna-bhau-sathe/#more-696

my life style बद्दल जाणून घेऊ थोडं एका ठिकाणी बसून सर्व गोष्टी जागेवर मिळणे ही पारंपारिक सुखाची व्याख्या आहे या सुखाच्या शोधातच माणसाच्या जीवनाचे यांत्रिकीकरण झाले. माणसाच्या सुखाच्या शोधामुळेच घरातल्या दळणासाठी यांत्रिक गिरणी कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन भांडी धुण्यासाठी डिश वॉश झाडू फरशी करण्यासाठी व्याक्युम क्लिनर आले.

ONDC (Open Network For Digital Commerce) ONDC हे स्वतः भारत सरकारने सुरू केलेला प्रकल्प आहे. ONDC ची सुरुवात ( Ministry Of Commerce And Industry ) यांच्या अंतर्गत येणाऱ्या Department for Promotion of Industry Internal Trade ) (DPIIT) Section 8 अंतर्गत सुरू करण्यात आली आहे म्हणजे Non Profit Company आहे.   Swiggy – २५० घेते. Zomota – २८० तर ONDC – २३० असे पैसे घेत होती. ONDC ही आपल्याला पर्याय देते की आपल्या कोणत्या कंपनी कडून ऑर्डर घ्याची आहे.

https://aaplamaharashtra.com/ondc/#more-335

Leave a Comment

dr babasaheb ambedkar photo