MS Dhoni : टी-20 वर्ल्ड कप: टीम इंडियाच्या मेंटॉर भूमिकेसाठी धोनी कोणतीही फीस आकारणार नाही

dhoni will not charge any fees for the role of mentor confirms bcci

क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांनी म्हटले आहे की, टी -20 विश्वचषकात भारतीय संघासोबत मेंटॉर म्हणून पाहिले जाणारा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी(MS Dhoni) बोर्डाकडून कोणतेही शुल्क आकारणार नाही. शाह यांनी एएनआयला सांगितले- एमएस धोनी टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघाचे मार्गदर्शक म्हणून त्याच्या सेवेसाठी कोणतेही मानधन घेणार नाही.

धोनी दिसणार मार्गदर्शकाच्या भूमिकेत ओमान आणि यूएईच्या मैदानावर 17 ऑक्टोबरपासून टी -20 विश्वचषक सुरू होत आहे. या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात धोनी संघाशी मेंटॉर म्हणून जोडला गेला आहे. तो ड्रेसिंग रूममधून खेळाडूंना प्रोत्साहन देताना दिसेल. एमएस धोनीची वर्ल्डकपसारख्या स्पर्धेसाठी मार्गदर्शक म्हणून नियुक्ती भारतीय क्रिकेटसाठी मोठी सकारात्मक मानली जाते. धोनी 15 ऑगस्ट 2020 रोजी निवृत्त झाला आहे.

धोनीचा अनुभवाचा संघाला होणार फायदा! भारताने 2017 च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत, 2019 च्या एकदिवसीय विश्वचषकाची उपांत्य फेरी आणि या वर्षी खेळल्या गेलेल्या विश्व कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले होते. मात्र, सर्व बाद फेरीच्या सामन्यांमध्ये संघाला पराभवाला सामोरे जावे लागले.

Virat Kolhi:विराट कोहलीने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला, ट्विट करून माहिती दिली

या वेळी धोनीचा अनुभव संघासाठी आणि कर्णधार कोहलीला बाद फेरीसारख्या महत्त्वाच्या सामन्यांमध्ये खूप उपयुक्त ठरू शकतो. 24 ऑक्टोबर रोजी भयंकर सामना खेळला जाईल टी -20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया आपल्या मोहिमेची सुरुवात 24 ऑक्टोबर रोजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध करेल. दोन्ही संघांमधील हा महान सामना दुबईच्या मैदानावर खेळला जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here