Cyclone Tauktae Updates : गुजरातसहीत अनेक जिल्ह्यांमध्ये प्रचंड नुकसान, हजारो गावे अंधारात

Cyclone Tauktae Updates : गुजरातसहीत अनेक जिल्ह्यांमध्ये प्रचंड नुकसान, हजारो गावे अंधारात

सोमवारी दुपारनंतर चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या काही किलोमीटर अंतरापासून गुजरातकडे सरकले. त्यावेळी ताशी १९० किलोमीटरहून अधिक वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यांनी तडाखा दिला.

गुजरातला धडकले त्यावेळी तौक्तेचे स्वरूप अतिशय तीव्र झाले होते. चक्रीवादाळाची पूर्वसूचना मिळाल्यामुळे गुजरातचे प्रशासन सामना करण्यासाठी सज्ज होते.

SIDBI भारतीय लघुउद्योग विकास बँक येथे विविध रिक्त पदांची भरती,आजच करा अर्ज

१६ हजारांवर घरांचे नुकसान१६ हजारांहून जास्त घरांचे नुकसान झाले आहे. तसेच ४० हजार झाडे आणि १० हजारांहून अधिक विजेचे खांब पडले आहेत. त्यामुळे सौराष्ट्र, दीव, उना इत्यादी भागातील अनेक जिल्ह्यांमध्ये वीजपुरवठा अनेक तास खंडित झाला होता.

सुमारे १६ कोविड रुग्णालयांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यापैकी १२ रुग्णालयांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here