Cyclone Tauktae Update: वादळानं दिशा बदलली; मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता

Cyclone Tauktae
Cyclone Tauktae

Weather Update: सध्या अरबी समुद्रात तौत्के चक्रीवादाळाचं (Cyclone Tauktae) संकट घोंघावत आहे. हे चक्रीवादळ आता हळूहळू उग्र रुप धारण करत त्यानं आपली दिशा बदलली आहे. आता हे वादळ मुंबईला भेदून गुजरातच्या दिशेनं जाऊ शकत

अरबी समुद्रात तौत्के चक्रीवादाळाचं संकट वेढा घालत आहे. हे चक्रीवादळ.आता हळूहळू उग्र रुप धारण करत त्यानं.आपली दिशा.बदलली आहे. आता हे वादळ मुंबईला भेदून.गुजरातच्या दिशेनं आगेकूच करणार आहे. सध्या हे.वादळ कोकण किनारपट्टीला धडकलं.असून मुंबईसह.रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि उर्वरित कोकणातील.नागरिकांसाठी धोका वाढताना.दिसत आहे. त्याचबरोबर आज दुपारी मुंबईत मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

त्यामुळे नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा सल्लाही हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. काल रात्री मुंबई-पुण्यासह संपूर्ण कोकण पट्ट्याला वादळी पावसानं झोडपलं आहे. तर अनेक ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या आहे, त्यामुळे नागरिकांचं जनजीवन विस्कळीत होताना दिसत आहे. आज पुन्हा मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्गासह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. मागील काही तासांपासून याठिकाणी जोरदार पावसासह वाऱ्याचा वेग वाढला आहे.

Wheather Updates : येत्या 24 तासात अरबी समुद्रात चक्रीवादळ , जाणून घेऊया महाराष्ट्रावरील परिणाम

रात्री उशिरापर्यंत या जिल्ह्यातील तौत्के वादळाचा प्रभाव कमी होईल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यातल आला आहे. तौत्के चक्रीवादळाचं केंद्र हे गोवा किनापट्टीपासून 100 किमीपेक्षा कमी अंतरावर आहे. त्यामुळे गोव्यासह सिंधुदुर्गाला वादळाचा आणि समुद्री लाटांचा जोरदार तडाखा बसण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here