Cyber Attack on Air India: एअर इंडियाचा सर्व्हर हॅक,क्रेडिट कार्डसारखी अनेक महत्त्वाची माहिती लीक

Cyber Attack on Air India

सरकारी एअरलाइन असणाऱ्या एअर इंडियावर (Air India) मोठा सायबर हल्ला (Cyber Attack on Air India) झाला आहे. यामध्ये ग्राहकांची वैयक्तिक माहिती लीक झाली आहे. भारताची सरकारी एअरलाइन असणाऱ्या एअर इंडियावर (Air India) एक मोठा सायबर हल्ला (Cyber Attack on Air India) झाला आहे. यामध्ये ग्राहकांची वैयक्तिक माहिती लीक झाली आहे. त्यामध्ये क्रेडिट कार्ड संबंधित माहिती, पासपोर्ट यासारखी महत्त्वाची माहिती समाविष्ट आहे.

 या घटनेमुळे ऑगस्ट 2011 पासून फेब्रुवारी 2021 पर्यंतचा डेटा आहे. जगभरातील एकूण 45 लाख प्रवाशांचा डेटा लीक झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान अशी माहिती मिळते आहे इतर काही इंटरनेशन एअरलाइन्सवर देखील सायबर हल्ल्याचा धोका आहे. एअर इंडियाचा सर्व्हर हॅक करत मोठ्या प्रमाणात डेटा प्रभावित झाल्याची माहिती मिळते आहे.

यामध्ये एअर इंडियाच्या प्रवासी सेवा प्रणालीला लक्ष्य करण्यात आलं होतं. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार 26 ऑगस्ट 2011 ते 3 फेब्रुवारी 2021 दरम्यानच्या डेटाचा यामध्ये समावेश आहे. यामध्ये प्रवाशांचे नाव, जन्मतारीख, फोन नंबर, पासपोर्टची माहिती, तिकिटांची माहिती, क्रेडिट कार्ड डिटेल्सचा या सगळ्याचा समावेश आहे.

International Tea Day 2021| Receipe Of Tea : जाणून घ्या चहाचा इतिहास, विधी, प्रकार आणि बरेच काही

एअर इंडियाने असं म्हटलं आहे की यामध्ये जगभरातील एकूण 45 लाख डेटा लीक झाला आहे. आमच्या डेटा प्रोसेसरमध्ये CVV/CVC नंबर नसतात. आमच्या डेटा प्रोसेसरने हे सुनिश्चित केले आहे की, प्रभावित सर्व्हरवर कोणत्याही प्रकारची असमान्य हालचाल पाहायला मिळाली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here