Cruise Drugs Case: सॅनिटरी पॅडमध्ये लपवले होते ड्रग्ज, जाणून घ्या कोण आहे ती ?

Cruise Drugs Case: सॅनिटरी पॅडमध्ये लपवले होते ड्रग्ज, जाणून घ्या कोण आहे ती ?

बॉलीवूडचा किंग खान शाहरुखच्या मुलाला (king khan shahrukh khan)आर्यन खानला (Aryan Khan) 7 ऑक्टोबरपर्यत कोठडी सुनावण्यात आली आहे. आर्यनला एनसीबीने अटक केल्यानंतर त्या प्रकरणामध्ये आणखी काही नावे समोर आली आहे.

FSSAI Recruitment 2021 : भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणामध्ये विविध पदाच्या 255 जागा

नूपुरच्याबाबतची एक मोठी माहिती समोर आली आहे. त्यात तिने कशापद्धतीने ड्रग्ज क्रुझवर नेले याविषयीचा धक्कादाय़क खुलासा उघड झाला आहे. आर्यनसोबत इतर नऊ आरोपींना देखील ताब्यात घेण्यात आले आहे.

एनसीबीने (NCB) ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची चौकशी करण्यात येत आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काहींनी डब्ब्यामध्ये, तर काहींनी सॅनिटरी पॅडमध्ये ड्रग्ज लपवून आणले होते. मुंबईवरुन गोव्याला जाणाऱ्या त्या क्रुझवर आर्यन खान सहित जे इतर सहकारी होते. एनसीबीनं सापळा रचून त्या क्रुझवर छापा टाकला. बॉलीवूडचा स्टार अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची गेल्या दोन दिवसांपासू एनसीबीच्या कोठडीत आहे. मुनमुन धमेचालाही (Munmun Dhamecha ) ताब्यात घेण्यात आले आहे.

Havana Syndrome : भारताची चर्चा जगभरात, जाणून घ्या काय आहे Havana Syndrome?

एनसीबीने नुपूर सारिकाकडून  (Nupur Sarika) ड्रग्ज जप्त केले आहे.नुपूर सारिका एक शिक्षिका आहे. तिला एकानं ड्रग्ज दिले होते तिने ते सॅनिटरी पॅडमध्ये लपवले असल्याची माहिती पुढे आली आहे.

या प्रकरणामध्ये इस्मित सिंग, मोहक जसवाल, विक्रांत चोकर यांनाही एसीबीने ताब्यात घेतले आहे. मोहक जसवाल (Mohak Jaiswal) हा दिल्लीत राहणारा आहे. तो आयटी प्रोफेशनल आहे. त्याने मुंबईत एका लोकलमधून अनोळखी व्यक्तीकडून ड्रग्ज घेतले होते आणि ते ड्रग्ज नुपूरला सॅनिटरी पॅडमध्ये लपवण्याचा सल्लाही दिला होता.आपण ज्यावेळी त्या पार्टीमध्ये जाऊ तेव्हा ते आपल्याला परत देण्यास सांगितले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here