CoronaVirus News Updates:  3 लाख 86 हजार नवे रुग्ण, काल 24 तासांत 3498 जणांचा मृत्यू

Maharashtra CoronaVirus update

CoronaVirus News Updates :  3 लाख 86 हजार नवे रुग्ण, काल 24 तासांत 3498 जणांचा मृत्यू

भारतामध्ये शुक्रवारी कोरोनाचे ३ लाख ८६ हजार नवे रुग्ण आढळून आले असून हा आज पर्यंतचा उच्चांक आहे. गेल्या चोवीस तासांत या संसर्गामुळे ३४९८ जणांचा बळी गेला आहे.

देशात कोरोनाचे १ कोटी ८७ लाख रुग्ण असून त्यातील १ कोटी ५३ लाख जण बरे झाले.

India Post GDS Recruitment 2021:महाराष्ट्र टपाल विभागात 2400+ पदांची महाभरती,केवळ 10वी पास, कोणतीही परीक्षा नाही.

कोरोना रुग्णांची एकूण संख्या १,८७,६२,९७६ असून त्यापैकी १,५३,८४,४१८ जण बरे झाले. शुक्रवारी कोरोनाचे ३,८६,४५२ नवे रुग्ण सापडले व २,९७,५४० जण बरे झाले.

भारतात कोरोनामुळे आजवर २ लाखांवर मृत्यू झाले आहेत, तर उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या ३१ लाख ७० हजार २२८ आहे. या संसर्गातून बरे झालेल्यांचे प्रमाण ८२ टक्के आहे.

Rohit Sardana :प्रसिद्ध पत्रकार आणि वृत्तनिवेदक रोहित सरदाना यांचं निधन

जगभरात कोरोना रुग्णांची संख्या १५ कोटींवर पोहोचली आहे. त्यातील १२ कोटी ८६ लाख जण बरे झाले तर आतापर्यंत ३१ लाख ८१ हजार लोकांचा बळी गेला. जगात सध्या १ कोटी ८८ लाख रुग्णांवर उपचार सुरूआहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here