CoronaVirus: भारतावर संकट! हृदय तुटले, दोनजगज्जेत्या कंपन्यांचे सीईओ मदतीला धावले

CoronaVirus: भारतावर संकट! हृदय तुटले, दोनजगज्जेत्या कंपन्यांचे सीईओ मदतीला धावले

कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये (Corona Pandemic) अवघ्या जगाच्या मदतीला धावून जाणाऱ्या भारताला कोरोनाने दुसऱ्या लाटेमध्ये घेरले आहे. अशावेळी अमेरिकेच्या दोन बड्या कंपन्या, ज्यांचे सीईओ भारतीय आहेत त्यांनी मोठी मदत देऊ केली आहे. मायक्रोसॉफ्ट आणि गुगलने या मदतीची घोषणा केली आहे. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला (Microsoft CEO Satya Nadella) यांनी अत्यंत दु:खी असल्याचे म्हटले आहे. तसेच कंपनीची सारी ताकद भारतासाठी लावणार असल्याची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन Google ने आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी भारताच्या मदतनिधीमध्ये १३५ कोटी रुपयांची मदत देऊ केली.Iतर अमेरिकेचीच आणखी एक कंपनी गुगल आणि अल्फाबेटचे भारतीय वंशाचे सीईओ सुदर पिचाई (Google and Alphabet CEO Sundar Pichai) यांनी देखील युनिसेफच्या भारतासाठीच्या मदतीच्या फंडामध्ये आपली कंपनी १३५ कोटी रुपये देणार असल्याची घोषणा केली. तसेच भारताला फायदा न घेता वैद्यकीय मदत, कोरोनाच्या प्रसाराची आणि रोखण्याची सर्व माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

भारतीय एनएसए अजित डोवाल आणि अमेरिकेचे समकक्ष जेक सुलिवन यांच्यामध्ये रविवारी फोनवर चर्चा झाली. यानंतर अमेरिका आपल्या आडमुठेपणाच्या धोरणावरून मागे हटली आहे. तसेच भारताला सहकार्य करण्यावर चर्चा करण्यात आली. या दोघांच्या चर्चेनंतर व्हाईट हाऊसच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या प्रवक्त्या एमिली होर्ने यांनी सांगितले की, अमेरिकेतील हॉस्पिटले कोरोनाच्या सुरुवातीच्या संकटात झगडत होती. तेव्हा भारताने मोठी मदत आम्हाला केली होती. यासारखीच अमेरिकादेखील भारताला या कठीण काळात मदत करण्यासाठी उभा आहे. अमेरिका भारताला रॅपिड डायग्नोस्टिक टेस्टकिट, व्हेंटिलेटर आणि पीपीई किट देणार आहे.जो बायडेन यांच्या मदतीच्या ट्विटनंतर भारतीय वंशाच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनीदेखील ट्विट करून भारताला गरजेच्या पकरणांची मदत तातडीने दिली जाणार आहे

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here