Coronavirus: भारतात पहिल्यांदाच चोवीस तासात कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा 3 लाखाच्या पार,कोरोना रुग्णसंख्येतही घट

CoronaVirus live update

देशात कोरोनाचे रुग्ण वाढत होते, मागील दहा दिवसांपासून देशात दररोज तीन लाखाहून अधिक कोरोना (CoronaVirus)रुग्णांची नोंद होत आहे. मात्र, आता काही प्रमाणात दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. चोवीस तासात 3 लाख 8 हजार 522 लोक बरे होऊन घरी परतले आहेत. पहिल्यांदाच एकाच दिवसात एवढ्या मोठ्या संख्येनं रुग्ण बरे झाले आहेत. तर, रुग्णसंख्येतही शुक्रवारच्या तुलनेत घट झाली आहे. या चोवीस तासांमध्ये 3,684 जणांचा मृत्यू झाला आहे. याआधी शुक्रवार कोरोना रुग्णसंख्येनं आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड तोडले होते. शुक्रवारी एका दिवसात देशात 4 लाख 1 हजार 911 नवे रुग्ण आढळले होते. गेल्या चोवीस तासात जगभरात 8.66 लाख नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यातील 46 टक्के रुग्ण एकट्या भारतातील आहेत.

हे नक्की वाचा: CBSE Exam Result 2021 : दहावीच्या गुणांचे सूत्र जाहीर ,निकाल २० जूनला

महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. राज्यात शनिवारी कोरोनाचे 63,282 नवे रुग्ण आढळले आहेत. तर, 802 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत.कोरोनाबाधित झालेल्या एकूण रुग्णांची.संख्या.46,65,472 वर पोहोचली आहे..यातील 69,615.रुग्णांचा मृत्यू झाला आहे..राज्यात शुक्रवारी कोरोनाचे.62,919 नवीन रुग्ण.समोर आले होते. तर, 828 जणांचा मृत्यू झाला आहे.

शनिवारी मुंबईमध्ये 3,897 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर, 90 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईमधील आतापर्यंतच्या एकूण कोरोनाबाधितांची संख्या 6,52,368 वर पोहोचली आहे. तर, 13,215 जणांचा मृत्यू झाला आहे. मागील चोवीस तासात राज्यात 61,326 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. यानंतर आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 39,90,302 वर पोहोचली आहे. राज्यात सध्या 6,63,758 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here