CoronaVirus in India: रुग्णसंख्येनं पुन्हा ओलांडला 4 लाखाचा टप्पा,मृतांचा आकडा घटला

CoronaVirus in India:कोरोना रुग्णसंख्या कमी होण्याचं चित्र दिसत नाही.रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढच होत आहे. सलग दोन दिवस देशात एकाच दिवसात 4 लाखाहून अधिक रुग्ण आढळले आहेत. देशात आतापर्यंत तीन वेळा कोरोना रुग्णांची दैनंदिन संख्या 4 लाखाच्या पार गेली आहे. मागील चोवीस तासात देशात 4 लाख 14 हजार 182 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 3,920 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बुधवारबद्दल बोलायचं झाल्यास यादिवशी 4 लाख 12 हजार 262 रुग्ण आढळले होते. तर, 3,980 रुग्णांचा मृत्यू झाला होता.

हे नक्की वाचा: JOBS In Maharashtra:आरोग्य विभागात 16 हजार पदांची भरती, 100 टक्के पदभरतीला मान्यता

आरोग्य मंत्रालयानं सांगितलं, की नवीन रुग्णसंख्या समोर आल्यानंतर आतापर्यंतच्या एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2,14,91,592 वर पोहोचली आहे. तर, या विषाणूमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 2,34,088 हून अधिक झाली आहे. कोरोनाचा प्रसार वाढत असतानाच या महामारीतून बरे होणाऱ्यांची संख्याही वाढत असल्याचं दिलासादायक चित्र आहे. मागील चोवीस तासात 3 लाख 28 हजार 141 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.

राज्यात कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ होत असल्याचं चित्र आहे. राज्यात गुरुवारी कोरोनाचे नवे 62,194 रुग्ण आढळले आहेत. तर, 853 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत राज्यात 73,515 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर, बाधितांची एकूण संख्या 49,42,736 इतकी झाली आहे. बुधवारच्या तुलनेत कोरोना रुग्णांच्या संख्येत 4554 ने वाढ झाली आहे. तर, मृतांची संख्या मात्र घटली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here