Coronavirus: देशात कोरोनाचा विळखा वाढला आता.दैनंदिन रुग्णसंख्येनं ओलांडला 4 लाखाचा टप्पा

Coronavirus: कोरोनाचा विळखा आणखी वाढला आता दैनंदिन रुग्णसंख्येनं ओलांडला 4 लाखाचा टप्पा .कोरोनामुळे (Coronavirus) देशात चिंतेचं वातावरण आहे. रुग्णसंख्येत आणखी किती वाढ होणार, याबद्दल काहीही अंदाज नाही. अशात आता शुक्रवारची रुग्णसंख्या (Coronavirus Latest Update) समोर आली असून.

हे नक्की वाचा: International Labour Day 2021 : जाणून घेऊया कामगार दिनाचे महत्व

रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढच होत असल्याचं समोर आली.24 तासात देशात 4 लाखाहून अधिक रुग्ण आढळले आहेत. देशात शुक्रवारी आतापर्यंतचे सर्वाधिक 4 लाख 02 हजार 110 नवीन रुग्ण आढळले आहेत. यानंतर एकूण बाधितांची संख्या 1 कोटी 91 लाख 57 हजार 094 इतकी झाली आहे.देशाण आता सक्रीय रुग्णांची संख्याही 32 लाखाहून अधिक झाली आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, शुक्रवारी एका दिवसात कोरोनामुळे 3522 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यानंतर कोरोनानं आतापर्यंत जीव गमावलेल्यांची संख्या 2,11,836 वर पोहोचली आहे. अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येतही सातत्यानं वाढ होत आहे. ही संख्या आता 32,63,966 वर पोहोचली आहे. एकूण बाधितांच्या संख्येत हा आकडा 16.90 टक्के इतका आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here