Coronavirus: कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांना धोका वाढणार, बचावासाठी आतापासून घ्या अशी खबरदारी

Coronavirus

Coronavirus: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये मुलांना कोरोनाचा धोका वाढणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे चिंतेचे वातावरण आहे. तसेच कोरोनाचा सामना करण्यासाठी मुलांची रोगप्रतिकारशक्ती योग्य ठेवण्यासाठी काय करता येईल याची विचारणा पालकांकडून होत आहे. त्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.

कोरोनाच्या लाटेचा जबरदस्त तडाखा सध्या देशाला बसला आहे. मात्र ही लाट ओसरण्यापूर्वीच कोरोनाच्या पुढच्या लाटेबाबतची भीती व्यक्त करण्यात येऊ लागली आहे. या लाटेमध्ये मुलांना कोरोनाचा धोका वाढणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अनेक राज्यांनी आतापासून तयारी सुरू केली आहे. या सर्वामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. तसेच कोरोनाचा सामना करण्यासाठी मुलांची रोगप्रतिकारशक्ती योग्य ठेवण्यासाठी काय करता येईल याची विचारणा पालकांकडून होत आहे.

हे नक्की वाचा: CoronaVirus in India: रुग्णसंख्येनं पुन्हा ओलांडला 4 लाखाचा टप्पा,मृतांचा आकडा घटला

कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या महाराष्ट्राबाबत बोलायचे झाल्यास राज्यातमध्ये आतापर्यंत ० ते १० वर्षांपर्यंतच्या १ लाख ४५ हजार ९३० मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. दररोज ३०० ते ५०० मुलांना कोरोनाचा संसर्ग होत आहे. तर राज्यात ११ ते २० वर्षांदरम्यानच्या ३ लाख २९ हजार ७०९ मुलांना आणि तरुणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे पालकांची चिंता आधीपेक्षा अधिक वाढली आहे.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार मुलांना तुम्ही एखा मर्यादेपर्यंत सप्लिमेंट्स देऊ शकता. यामध्ये १५ दिवसांसाठी झिंक, एका महिन्यासाठी मल्टी व्हिटॅमिन आणि एका महिन्यासाठी कॅल्शियमचा कोर्स दिला जाऊ शकतो. या सर्व बाबी इम्युनिटीला बुस्ट अप करता येऊ शकतो. मात्र व्हिटॅमिनच्या नैसर्गिक स्रोतांचा अधिकाधिक वापर करावा असा सल्लाही डॉक्टरांकडून देण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here