Corona Virus News Updates : कोरोनाचे ३.९२ लाख नवे रुग्ण , सक्रिय रुग्ण ३३ लाख

Corona Virus News Updates

Corona Virus News Updates : कोरोनाचा प्रादुर्भाव झालेले तीन लाख ९२ हजार ४८८ नवे रुग्ण रविवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत नोंद झाले. याच कालावधीत 3 हजार ६८९ रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे एकूण मृतांची संख्या दोन लाख १५ हजार ५४२ झाली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी दिलेल्या माहितीनुसार, एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 कोटी ९५ लाख ५७ हजार ४५७ झाली आहे. सध्या ३३ लाख ४९ हजार ६४४ रुग्णांवर कोरोनाचे उपचार सुरू आहेत.

हे नक्की वाचा :Coronavirus: भारतात पहिल्यांदाच चोवीस तासात कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा 3 लाखाच्या पार,कोरोना रुग्णसंख्येतही घट

एक कोटी ५९ लाख ९२ हजार २७१ जण कोरोनामुक्त झाले आहेत.एक कोटी ५९ लाख ९२ हजार २७१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. एकूण रुग्णांपैकी उपचाराधीन रुग्णांची टक्केवारी १७.१३ टक्के आहे, तर देश पातळीवर कोरोनातून बरे होणाऱ्यांची टक्केवारी ८१.७७ टक्क्यांवर आली आहे.

एकूण बाधितांच्या संख्येच्या तुलनेत मृत्यूचा दर खाली येऊन १.१० टक्क्यांवर आला आहे.

राज्यनुसार संख्या – महाराष्ट्र- ६९,६१५, दिल्ली- १६,५५९, कर्नाटक- १५,७९४, तामिळनाडू- १४,१९३, उत्तर प्रदेश- १२,८७४, पश्चिम बंगाल- ११,४४७, पंजाब- ९,१६० आणि छत्तीसगड- ८,८१०. एकूण मृतांपैकी ७० टक्क्यांपेक्षा जास्त मृत्यू हे एकापेक्षा जास्त आजारांमुळे झाले, असे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here