Corona Virus Latest Updates : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत घट

Corona Virus Latest Updates : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत घट

देशात गेल्या 24 तासात  1 लाख 65 हजार 553 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 460 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 2 लाख 76 हजार 309 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत सलग तिसऱ्या दिवशी मोठी घट पाहायला मिळत आहे. नवे कोरोनाग्रस्त रुग्ण घटतानाच कोरोनाबळींच्या संख्याही कमी झाली आहे तसेच कोरोनातून बरे होणाऱ्यांचीही संख्या वाढत आहे.

Aspergillosis : काळ्या, पांढर्‍या आणि पिवळ्या नंतर एक नवीन फंगल संसर्ग, त्याबद्दल सर्व जाणून घ्या

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 कोटी 78 लाख 94 हजार 800 वर गेला आहे. देशात 2 कोटी 54 लाख 54 हजार 320 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत 3 लाख 25 हजार 972 रुग्णांनी कोरोनामुळे (Corona) प्राण गमावले आहेत.

Maharashtra SSC Result 2021 : दहावीचा निकाल जूनमध्ये, 11 वी प्रवेशाची प्रक्रियाही ठरली

कोरोना लसीकरण (Vaccination)झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 21 कोटी 20 लाख 66 हजार 614 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here