Corona Virus Latest Updates :राज्यात कोरोना स्थिती दिलासादायक, ४० हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त

Corona Virus Latest Updates :राज्यात कोरोना स्थिती दिलासादायक, ४० हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त

राज्यात शनिवारी ४० हजार २९४ रुग्णांनी कोरोनावर मात केली, तर आतापर्यंत ५१ लाख ११ हजार ९५ रुग्ण कोरोनामुक्त ( Corona Virus) झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९०.४ टक्क्यांवर आले आहे, तर सध्या ३ लाख ५२ हजार २४७ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्यात दिवसभरात २६ हजार १३३ रुग्ण आणि ६८२ मृत्यूंची नोंद झाली आहे. आता राज्यातील कोरोनाबाधितांची (Covid19)संख्या ५५ लाख ५३ हजार २२५ इतकी असून, मृतांचा आकडा ८७ हजार ३०० आहे.

SAI Recruitment 2021 :भारतीय क्रीडा प्राधिकरणात 320 जागांसाठी भरती,आजच करा अर्ज

राज्याचा मृत्युदर १.५७ टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३ कोटी २७ लाख २३ हजार ३६१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६.९७ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात २७ लाख ५५ हजार ७२९ व्यक्ती होम क्वाॅरंटाइनमध्ये आहेत, तर २२ हजार १०३ व्यक्ती संस्थात्मक क्वाॅरंटाइनमध्ये आहेत.

दिवसभरात नोंद झालेल्या ६८२ मृत्यूंपैकी ३९२ मृत्यू हे मागील ४८ तासांतील, तर २९० मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत.

 PUBG MOBILE New State | PUBG 2.0 Latest Updates: बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडिया नंतर, पब्जी मोबाइल न्यू स्टेट बंद अल्फा चाचणीची घोषणा 

आतापर्यंत एकूण २ कोटी ६ लाख २४ हजार ९३० लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. राज्यात ११ लाख ५६ हजार २४५ आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा पहिला, तर ७ लाख १७ हजार ८२४ आरोग्य कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here