Corona Virus in India Latest Updates : देशात चार लाखांहून अधिक रुग्ण

Corona Virus in India Latest Updates : देशात चार लाखांहून अधिक रुग्ण

Corona Virus in India Latest Updates: कोरोना (Covid19) चे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे.कोरोना व्हायरसची (Corona Virus) दुसरी लाट तसेच लसीकरण आणि बहुतांश राज्यांनी लॉकडाऊन (Lockdown) लावूनही कोरोना संक्रमन थांबेना.

गेल्या तीन दिवसांपासून सलग नव्या रुग्णांचा आकडा हा चार लाखांच्या पार येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.

Coronavirus: कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांना धोका वाढणार, बचावासाठी आतापासून घ्या अशी खबरदारी

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार (Health Ministry of India) देशात गेल्या 24 तासांत देशात 4,01,078 नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. तर 3,18,609 बरे झाले आहेत. मृतांचा आकडा खळबळजनक आहे. देशात गेल्या 24 तासांत 4,187 जणांचा मृत्यू झाला आहे.

 

देशात आजपर्यंत 2,18,92,676 कोरोनाबाधित सापडले आहेत. यापैकी 1,79,30,960 बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा 2,38,270 वर गेला आहे. सध्या देशात 37,23,446 रुग्ण उपचार घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here