Corona Vaccine Registrations : 18+ लोकांसाठी सायंकाळी ‘या’ वेळेपासून सुरु होणार लसीकरण

Corona Vaccine Registrations : 18+ लोकांसाठी सायंकाळी 'या' वेळेपासून सुरु होणार लसीकरण

Corona Vaccine Registrations : 18+ लोकांसाठी सायंकाळी ‘या’ वेळेपासून सुरु होणार लसीकरण

देशात कोरोना संक्रमनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे .देशात आधीच कोरोना लसीचा तुटवडा असताना केंद्र सरकारने १८ वर्षांवरील लोकांसाठी १ मे पासून लसीकरण (corona vaccination) करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.

आज २८ एप्रिलपासून लसीसाठी नोंदणी सुरु होणार असल्याचे सांगितले.त्यामुळे मध्यरात्रीपासूनच अनेकांनी लसिकरणासाठी रजिस्ट्रेशन करण्याचा प्रयत्न चालू केला आहे .मात्र, त्यांना त्यांचे जन्म वर्ष टाकते क्षणी ४५ वर्षांनंतरचेच रजिस्टर करू शकतात असा मेसेज येत आहे. यामुळे सर्वत्र गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.

सरकारने १८ वर्षांवरील लोकांसाठी १ मे पासून लसीकरण (corona vaccination) करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. १ मे पासून १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांना कोरोना लस दिली जाणार आहे. यासाठी कोविन (CoWIN app) किंवा आरोग्य सेतू App (Arogya Setu App) कोरोना लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी करायची आहे.

India Post GDS Recruitment 2021:महाराष्ट्र टपाल विभागात 2400+ पदांची महाभरती,केवळ 10वी पास, कोणतीही परीक्षा नाही.

हे रजिस्ट्रेशन बुधवारी सायंकाळी ४ वाजल्यापासून सुरु होणार आहे. ४५ वर्षांवरील लोकांसाठी रजिस्ट्रेशन आधीसारखेच उपलब्ध असणार आहे.

www.cowin.gov.in किंवा को-विन अॅप द्वारे रजिस्टर करता येणार आहे. यामध्ये तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर करावा लागणार आहे.

रजिस्टर करताना तुमच्याकडे आधारकार्ड, पॅनकार्ड, ड्राव्हिंग लायसन किंवा मतदार ओळखपत्र असणे गरजेचे आहे. त्यावरील आयडी नंबर आणि इतर माहिती तंतोतंत जुळणारी टाकावी लागणार आहे.

Maharashtra CoronaVirus update :खुशखबर ! राज्यात मे महिन्यात कोरोना चे प्रमाण होणार कमी ,टास्क फोर्स ने वर्तवले

जाणून घ्या कशी असेल रजिस्ट्रेशन प्रक्रिया :

1 . www.cowin.gov.in या अधिकृत साईटवर जा.
2 . Register/ Sign in yourself मध्ये तुमचा मोबाईल नंबर टाईप करा.
3 . तुम्हाला OTP येईल तो तेथे टाका व क्लिक करा.
4 .Vaccine Registraction form भरा.
5 . schedule appointment वर क्लिक करा.
6 . पिन कोड टाका (उदा.422062)
7 . Sesstion निवडा- सकाळचे किंवा दुपारचे.
8 . Vaccin center व Date निवडा.
9 . Appointment book करून ती conform करा.
10. Appointment details चा मेसेज मोबाईलवर येईल.

अशा प्रकारे आपण आपले रजिस्ट्रेशन करून लसीकरण करून घेऊ शकता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here