maharashtra Health department exam finally canceled विभागाची परीक्षा रद्द, हॉल तिकीटाच्या गोंधळामुळे मोठा निर्णय

maharashtra Health department exam finally canceled
maharashtra Health department exam finally canceled

maharashtra Health department exam finally canceled: कुणाच्या वडिलांचे नाव चुकीचे तर कुणाला थेट उत्तर प्रदेशमध्ये परीक्षा केंद्र मिळाल्याचा प्रकार आरोग्य विभागाच्या परीक्षेत (Maharashtra Health Department) उघड झाला होता. त्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. अखेर राज्य सरकारने ही परीक्षा तुर्तास रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. (maharashtra Health department exam finally canceled)

आरोग्य विभागातील पद भरतीसाठी 26 सप्टेंबर रोजी परीक्षा (Health Department Recruitment 2021) आयोजित करण्यात आली होती. पण हॉल तिकिटात संबंधित एजन्सीने प्रचंड गोंधळ घातल्याचं समोर आलं होतं. हॉल तिकीटमध्ये अनेक चुका समोर आल्या होत्या.

तर एका उमेदवाराला चक्क उत्तर प्रदेश नोएडा मधील सेंटर आले होते. काही मुलांचे लिंगाबाबत चुकीची माहिती दिली होती. काहींच्या हॉल तिकिटावर फक्त कॉलेजच नाव आहे. जिल्ह्याचा पत्ताच नाही. अशा उमेदवारांनी सेंटरवर जायचं तरी कसं?

याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित केला जात होता. त्यामुळे आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी या गोंधळात लक्ष घालावे अशी मागणी परीक्षार्थी करत होते. ‘न्यासा’ या खासगी एजन्सीला या भरतीचे कंत्राट दिल्याची माहिती समोर आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here