मोठी बातमी ! दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा

Maharashtra SSC ,HSC Exams 2021: कोरोनाचे दिवसेंदिवस वाढते प्रमाण लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत परंतु बारावीच्या परीक्षा होणारच असा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. परंतु कोरोना संक्रमनाच्या काळात कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये यासाठी राज्य शिक्षण मंडळाने महत्त्वाची पावलं उचलली आहेत. विद्यार्थ्यांना बारावीची परीक्षा सुरु होण्याच्या आदल्या दिवसापर्यंत अर्ज करण्याची मुभा देण्यात आली आहे,हा निर्णय राज्य शिक्षण मंडळाने सुनावला आहे .

बारावीची परीक्षा होणार

मागील आठवड्यात राज्यातील दहावीची परीक्षा रद्द केल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. त्यासोबतच बारावीच्या परीक्षा होणार असल्याचं ही त्यांनी वर्तवल . बारावीची परीक्षा मे महिन्याच्या शेवटी होऊ शकते असे वर्तवले जात आहे. परंतु बारावीच्या परीक्षा नेमक्या कधी होणार, शालेय शिक्षण खाते काय निर्णय देतात याकडे विद्यार्थी-पालक तसेच शिक्षक सर्वांचेच लक्ष लागून आहे.

कोरोना चा वाढता प्रसार पाहून परीक्षा घेतल्यास कोरोना संसर्गाचा धोका आहे त्यामुळे ऑफलाईन परीक्षा घेणे शक्य नाहीए. ग्रामीण भागात इंटरनेट नेटवर्कची पुरेशी सुविधा नाही उपलब्ध नाही त्यामुळे परीक्षा ऑनलाईन घेतल्या जाऊ शकत नाही त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी परिक्षेपासून वंचित राहू शकतात. आशा कारणांस्तव अखेर परीक्षा पुढे ढकलण्याखेरीज दुसरा कोणताही पर्याय नाही, असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला त्यामुळे बारावीची परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे.

हे नक्की वाचा: maharashtra lockdown: राज्यात आणखी 15 दिवस लॉकडाऊन ,15 मे प्रयत्न कायम

बारावी हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा आहे. सध्याच्या कोरोना परिस्थितीत परीक्षा कशी द्यायची हा सर्वांसमोर चिंतेचा विषय आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य ही आमची प्राथमिकता आहे असे वर्षा गायकवाड म्हटल्या. त्यामुळे बारावीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. बारावीची परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस होईल. जेणेकरून उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही. आता इतर शिक्षण महामंडळांनीही महाराष्ट्र सरकारचा हा निर्णय स्वीकारावा, अशी विनंती मी करत असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here