Battlegrounds Mobile India Pre-registration : बॅटलग्राउंड मोबाइल प्री-रजिस्ट्रेशनच्या तारखेची घोषणा कस कराल रजिस्ट्रेशन

Battlegrounds Mobile India Pre-registration

Battlegrounds Mobile India Pre-registration : पबजी चे भारतात लाखो चाहते आहेत. भारतात पबजीवर बंदी घातल्यानंतर पबजी प्रेमींमध्ये नाराजी पसरली होती. पण आता पबजी भारतात परतत आहे. नव्या रूपात Battlegrounds Mobile India च्या नावानं पबजी भारतात परतत आहे. दक्षिण कोरियाई गेम डेव्हलपर्स कंपनी Krafton ने Battlegrounds Mobile India च्या प्री-रजिस्ट्रेशनच्या तारीखेची घोषणा केली आहे.

गेमच्या प्री-रजिस्ट्रेशन 18 मेपासून गुगलच्या प्ले स्टोअरवरुन करता येणार आहे. गेम केव्हा रिलीज होणार, यासंदर्भात अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. परंतु, प्री-रजिस्ट्रेशन लिंक ओपन झाल्यानंतर लवकरच गेमही लॉन्च होईल, अशी शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहे. अद्याप गेम iOS युजर्ससाठी कधी लॉन्च होणार, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

कंपनीने एका स्टेटमेंटमध्ये सांगितलं की, प्री रजिस्ट्रेशन करणारे फॅन्स स्पेसिफिक रिवॉर्ड्ससाठी क्लेम करु शकणार आहेत. हे रिवॉर्ड्स केवळ भारतीय प्लेयर्ससाठीच असणार आहेत. प्री-रजिस्ट्रेशन करण्यासाठी युजर्सना गुगल प्ले स्टोअरवर जाऊन

प्री-रजिस्ट्रेश’ बटनवर क्लिक करावं लागेल. गेम लॉन्च झाल्यानंतर क्लेम करण्यासाठी रिवॉर्ड्स आपोआप उपलब्ध होतील. पबजी मोबाईलप्रमाणेच हा गेम सर्व युजर्सना खेळण्यासाठी उपलब्ध असणार आहे.प्री-रजिस्ट्रेशन करणाऱ्या फॅन्सना मिळणार रिवॉर्ड्स

PM Kisan Samman Nidhi Scheme 2021 : 8 वा हप्ता जारी, असे चेक करा बँक खाते

गेम डेवलपर्स क्राफ्टनने दिलेल्या माहितीनुसार, 18 वर्षांखालील गेम खेळणाऱ्या मुलांसाठी नियम थोडे कठोड करण्यात आले आहे. बॅटलग्राउंड मोबाईल इंडिया गेम खेळण्यासाठी या मुलांना पालकांची परवानगी घ्यावी लागणार आहे. तसेच पालकांचा नंबरही द्यावा लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here