Anurag Kashyap : अँजिओप्लास्टीनंतर दिसले वेगळ्या लुक मध्ये , पहा फोटोज्

Anurag Kashyap : अँजिओप्लास्टीनंतर दिसले वेगळ्या लुक मध्ये , पहा फोटोज्

चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप  (Anurag Kashyap) यांची मुलगी आलिया कश्यपने(Aaliyah Kashyap) नुकतीच आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून अनुराग कश्यपचा एक फोटो शेअर केला आहे. अनुरागचा हा लुक तुम्ही यापूर्वी कधी पाहिला नसेल.

हृदयात अडथळा निर्माण झाल्याने काही दिवसांपूर्वी अनुरागला रुग्णालयात दाखल केले होते. यानंतर, त्याला अँजिओप्लास्टी झाली. आता तो घरी आहे आणि त्याची तब्येत पूर्वीपेक्षा चांगली आहे. अँजिओप्लास्टीनंतर अनुरागचे हे पहिलेच चित्र समोर आले आहे.

Prithviraj Movies : अक्षय कुमारच्या ‘पृथ्वीराज’ चित्रपटाला करणी सेनेचा विरोध,पहा काय आहे कारण

अनुराग कश्यप ची  प्रकृती आता सुधारत आहे. डॉक्टरांनी त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. वृत्तानुसार, त्याला छातीत हलकी वेदना होत होती. त्यानंतर त्याने डॉक्टरांना दाखवले. अंधेरीच्या रुग्णालयात त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली.

Maharashtra Lockdown: राज्यात १५ जूनपर्यंत लॉकडाउन कायम; पण ‘या’ ठिकाणी होणार निर्बंध कमी

अनुराग कश्यपने मार्च महिन्यात त्याच्या आगामी ‘दोबारा’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले होते. वृत्तानुसार, शस्त्रक्रिया होण्यापूर्वी ते घरोघरी चित्रपटाचे पोस्ट प्रॉडक्शन काम करत होते. पण आता डॉक्टरांनी त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here