Amir Khan Kiran Rao Divorce: आमिर खानचा दुसऱ्यांदा घटस्फोट, किरण रावसोबत 15 वर्षांनी काडीमोड

Amir Khan Kiran Rao

Amir Khan Kiran Rao Divorce:अभिनेता आमिर खान (Amir Khan) आणि त्याची पत्नी किरण राव (Kiran Rao) या दोघांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. आमिर खान आणि किरण रावने संयुक्त निवेदन जारी करुन या निर्णयाविषयी माहिती दिली.

15 वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर आम्ही घटस्फोट घेत असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. आम्हाला आमच्या आयुष्यातील नव्या अध्यायाची सुरुवात करायची आहे. त्यामध्ये आम्ही पती-पत्नी नव्हे तर पालक आणि एकमेकांसाठी कुटुंबातील एक सदस्य असू.निवेदनात म्हटले आहे. आमिर खान आणि किरण राव यांच्या घटस्फोटामागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.

SBI Clerk Admit Card 2021:SBI Clerk Admit Card 2021 जाहीर,कसे पहाल आपले प्रवेश पत्र

अनेक जिल्ह्यांमध्ये त्यांनी ‘पाणी फाउंडेशन’च्या माध्यमातून मोठं काम केलं. यासाठी केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने त्यांची वेळोवेळी स्तुती केली. त्यांना भक्कम पाठिंबा दिला. किरण राव आणि आमीर खान या दोघांनी कित्येक गावांमध्ये पाण्याच्या रूपाने नवसंजीवनी आणली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here