Dilip Kumar यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; पत्नी ने मानले चाहत्यांचे आभार

actor dilip kumar discharged from mumbai hinduja hospital

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप(Dilip Kumar) कुमार यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना मुंबई मधील पीडी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

अभिनेते दिलीप कुमार यांना मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला आहे. श्वसनास त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

98 वर्षीय दिलीप कुमार यांच्या फुफ्फुसातून पाणी काढण्यासाठी बुधवारी (9 जून) दुपारी दीड ते दोनच्या दरम्यान एक लहानशी शस्त्रक्रिया करण्यात आली. वैद्यकीय भाषेत या शस्त्रक्रियेला ‘प्ल्यूरल एस्पिरेशन’ म्हटलं जातं.

Sushant Singh Rajput : सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणावर आधारित ‘न्याय द जस्टिस’ चे ट्रेलर रिलीज

ही शस्त्रक्रिया मुख्यतः फुफ्फुसात जमा झालेला कफ, श्वास घेण्यास येणाऱ्या अडचणी आणि l छातीतील वेदना दूर करण्यासाठी केली जाते. श्वास घेण्यास त्रास आणि ऑक्सिजन पातळी घसरल्याने त्याना रविवारपासूनच सातत्याने ऑक्सिजन दिला जात आहे. परंतु त्यांच्यावर सामन्य वॉर्डमध्येच उपचार सुरु  होते. मात्र बुधवारी झालेल्या शस्त्रक्रियेनंतर त्यांना आयसीयू वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं. डॉ. नितीन गोखले आणि डॉ. जलील पारकर यांच्या देखरेखीखाली दिलीप कुमार यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

डिस्चार्ज मिळाल्याची माहिती दिलीप (Dilip kumar)यांच्या ट्विटर हॅण्डलवरुनही देण्यात आली. त्यात म्हटलं आहेत. “तुम्हा सगळ्यांच्या प्रार्थनांमुळे दिलीप कुमार रुग्णालयातून आपल्या घरी जात आहेत. तुम्हा सगळ्यांचं प्रेम आणि स्नेह यामुळे कायमच दिलीप साहेबांचं मन भरुन येत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here