UGC NET 2021:NTA कडून NET परीक्षेची तारीख जाहीर,जानुन घ्या कसा कराल अर्ज

ugc net 2021 exam dates released by form reopens check

नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं (NTA) UGC च्या NET परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. डिसेंबर 2020 सत्राच्या परीक्षा आयोजित करण्यात पण कोरोनामुळे जून 2021 च्या अर्जाच्या प्रक्रियेत विलंब झाला त्यामुळे दोन्ही सत्रांची परीक्षा एकाच वेळी घेण्यात येत आहे.

ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या UGC NET UGC NET (UGC NET Exam date) परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. डिसेंबर 2020 सत्र परीक्षा आणि जून 2021 सत्र परीक्षा एकत्र केली गेली आहे.

आता दोन्ही सत्रांची परीक्षा एकाच वेळी 6 ऑक्टोबर ते 11 ऑक्टोबर 2021 या कालावधीत होणार आहे. इच्छुक उमेदवार ugcnet.nta.nic.in आणि nta.ac.in ला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 सप्टेंबर 2021 आहे. फी भरण्याची अंतिम तारीख 6 सप्टेंबर 2021 आहे. उमेदवार 7 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर दरम्यान त्यांच्या अर्जामध्ये सुधारणा करू शकतील.

यापूर्वी डिसेंबर 2020 सत्राची UGC NET परीक्षा 2 मे ते 17 मे 2021 दरम्यान होणार होती. UGC NETडिसेंबर.2020 साठी अर्ज प्रक्रिया फेब्रुवारी-मार्च 2021 मध्ये आयोजित केली गेली. असे उमेदवार ज्यांनी UGC NETडिसेंबर 2020 परीक्षेसाठी नोंदणी केली आहे परंतु अर्ज पूर्णपणे सादर करू शकले नाहीत ते https://ugcnet.nta.nic.in, www.nta.ac.in वर अर्ज पूर्ण करू शकतात.

6 ऑक्टोबर ते 11 ऑक्टोबर दरम्यान दोन शिफ्टमध्ये परीक्षा घेण्यात येईल. पहिली शिफ्ट सकाळी 9 ते दुपारी 12 आणि दुसरी शिफ्ट दुपारी 3 ते संध्याकाळी 6 पर्यंत असेल. ही परीक्षा संगणक आधारित (CBT) पद्धतीने घेतली जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here