Teacher’s Day 2021 | Dr. Sarvapalli Radhakrishnan : जाणून घ्या शिक्षक दिनाचा इतिहास आणि डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जीवनपरिचय

Teacher’s Day 2021 | Dr. Sarvapalli Radhakrishnan : जाणून घ्या शिक्षक दिनाचा इतिहास आणि डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जीवनपरिचय

भारतात दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो. हा स्मरणोत्सव आपल्या देशाचे पहिले उपराष्ट्रपती (दुसरे राष्ट्रपती) डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती आहे. डॉ.राधाकृष्णन यांनी भारताच्या शिक्षणाला आकार देण्यात मोलाचा वाटा उचलला आणि मुलांना शाळेत जाण्यासाठी आणि शिक्षण घेण्यासाठी प्रेरित केले.

देशभरातील महाविद्यालयांमध्ये विविध मनोरंजनात्मक उपक्रम घेऊन हा दिवस साजरा केला जातो. यामध्ये विद्यार्थी शिक्षकांचे कौतुक करतात आणि त्यांना शुभेच्छा आणि भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करतात.

Siddharth Shukla : बिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचे 40व्या वर्षी निधन

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ रोजी झाला. ते एक विद्वान शिक्षक होते. त्यांनी आपल्या आयुष्यातील चाळीस वर्षे शिक्षक म्हणून भारताचे भविष्य सुधारण्यात घालवले. शिक्षक म्हणून त्यांचे योगदान आणि मोलाचे काम लक्षात राहील म्हणून प्रत्येक वर्षी त्यांचा वाढदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.

जेव्हा डॉ.राधाकृष्णन भारताचे राष्ट्रपती झाले, तेव्हा काही मित्र आणि माजी विद्यार्थी त्यांना भेटायला आले. त्यांनी सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याकडे त्यांचा वाढदिवस भव्य पद्धतीने साजरा करण्याची परवानगी मागितली. याला डॉ.राधाकृष्णन म्हणाले की, माझा वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याऐवजी, शिक्षणाच्या क्षेत्रात शिक्षकांनी केलेल्या कामाचा, समर्पणाचा आणि मेहनतीचा सन्मान करून ५ सप्टेंबर साजरा केला तर मला अधिक आनंद आणि अभिमान वाटेल.तेव्हापासून ५ सप्टेंबरला शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याची प्रथा देशात सुरू झाली.

डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन जीवनपरिचय ( Biography of Dr. Sarvapalli Radhakrishnan)

BARC Recruitment 2021: भाभा अणु संशोधन केंद्र मुंबई येथे विविध पदांच्या भरती ,आजच करा अर्ज

डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 ला तेलुगु कुंटंबात तिरुत्तानी मध्ये झाला. विद्यार्थी असताना त्यांना अनेक शिष्यवृत्ती मिळाल्या होत्या. तिरुपतीमध्ये शिक्षण घेतल्यानंतर ते वेलोर येथे शिक्षणासाठी गेले. ख्रिश्चन महाविद्यालय,मद्रास येथून डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी तत्वज्ञानाचे शिक्षण घेतले. राधाकृष्णन यांना भारतातील एक तत्ववेत्ता म्हणून ओळखले जाते. तत्वज्ञानाचे शिक्षण घेतल्यानंतर डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन मद्रास प्रेसिडेन्सी महाविद्यालयात तत्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले.यानंतर ते म्हैसूर विद्यापीठात देखील तत्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची भारताचे दुसरे राष्ट्रपती म्हणून 1962 मध्ये निवड झाली होती. 1967 पर्यंत त्यांनी राष्ट्रपती म्हणून काम केले आहे.

सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी फिलॉसॉफी ऑफ रबींद्रनाथ टागोर, रिजन आणि रिलिजन इन कंटेम्पररी फिलॉसॉफी, द हिंदू विव्यू ऑफ लाईफ, आयडीलीस्ट विव्यू ऑफ लाईफ, कल्की ऑर द फ्युचर ऑफ सीव्हिलायझेशन, द रिलिजन वी नीड, गौतम द बुद्ध, इंडिया अँड चायना अशा पुस्तकांचे लेखन त्यांनी केले.

Exide Share Price | HDFC – Exide Life deal: तुम्ही तुमचे पैसे कुठे ठेवायचे? एक्साइड इंडस्ट्रीज एचडीएफसी लाईफला लाइफ इन्शुरन्स बिझच्या वितरणावर 14% वाढली

थँक्यू टीचर महाराष्ट्र सरकारचा उपक्रम

महाराष्ट्राच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शिक्षक दिनानिमित्त थँक्यू टीचर अभियान राबवले आहे. थँक्यू टीचर अभियानांतर्गत 5 सप्टेंबरला सोशल मीडियावर पोस्ट करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.शिक्षक दिनानिमित्त वर्षा गायकवाड यांनी केलेल्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here