Rakshabandhan 2021 : बहीण भावाच्या अतूट नात्याचा सण, जाणून घ्या शुभमुहूर्त

Rakshabandhan 2021 : बहीण भावाच्या अतूट नात्याचा सण, जाणून घ्या शुभमुहूर्त

Rakshabandhan 2021 : रक्षाबंधन (Raksha Bandhan) हा सण दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. यावेळी रक्षाबंधन रविवारी 22 ऑगस्ट रोजी येत आहे.

रक्षाबंधन हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस आहे. बहीण आपल्या भावाच्या दिर्घायुष्यासाठी भावाच्या हातावर राखी बांधते. तसेच आयुष्यभर आपलं रक्षण करावं, असं वचन बहिण भावाकडून घेते.

रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त

पौर्णिमा तिथी – 21 ऑगस्ट 2021 रोजी सायंकाळी 07 वाजेपासून ते 22 ऑगस्ट 2021 रोजी सायंकाळी 05 वाजून 31 मिनिटांपर्यंत

GUJCET Result 2021 : गुजरात कॉमन एन्ट्रन्स टेस्टचा निकाल जाहीर ,असा करा चेक

पूजेचा शुभ मुहूर्त – सकाळी 06 वाजून 15 मिनिटांपासून ते संध्याकाळी 05 वाजून 31 मिनिटांपर्यंत

राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त – दुपारी 01 वाजून 42 मिनिटांपासून ते संध्याकाळी 04 वाजून 18 मिनिटांपर्यंत राहील

लाडक्या भावाला राखी बांधण्यासाठी औक्षणाचं ताट सजवा. पाट ठेवून पाटाभोवती रांगोळी काढा. भावाला पाटावर बसवून त्याचं औक्षण करा. त्याच्या उजव्या हातात राखी बांधून त्याला मिठाई भरवा. तसेच त्याच्याकडून रक्षा करण्याचं वचन घ्या.

Mahavitaran Recruitment 2021 : पुणे येथे १४९ जागांसाठी भरती, आजच करा अर्ज

(Raksha bandhan Wishes) अशा द्या शुभेच्छा

1. माझ्या जीवनाचा प्रत्येक क्षणतु

झ्या रक्षणार्थ सरलेला असेल

राखीच्या प्रत्येक धाग्यासोबत
विश्वास तो सदैव उरलेला असेल
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा

2. विसवितात आठवणी, भराऱ्या घेतात आठवणी,
बहिण भावाच्या प्रेमाच्या साश्रृनयनांनी
बरसतात श्रावणसरी
रक्षाबंधनाचा हार्दिकशुभेच्छा

3. माझ्या ताईची माया
कायम राही माझी प्रेम छाया
झालीस माझीची लाडाची साया
ठेवेन सुखी हीच माझी पणया
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

4. रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन
घेऊन आला हा श्रावण
लाख लाख शुभेच्छा तुला
आज आहे पवित्र सण
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here