NPCIL RECRUITMENT2021:न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशनमध्ये १०७ जागा रिक्त,

NPCIL RECRUITMENT2021

NPCIL RECRUITMENT2021: न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCIL) मध्ये विविध पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून १३ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात अधिक माहिती मिळणार आहे.

(NPCIL) मध्ये ट्रेड अॅपेंटिस पदांच्या भरतीसाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. या अंतर्गत फिटर, टर्नर, मशिनिस्ट, इलेक्ट्रीशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, वेल्डर, कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट या पदांसाठी भरती केली जाणार आहे. एनपीसीआयएल अपेंटिस भरती २०२१ साठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट npcilcareers.co.in ला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया २५ ऑगस्टपासून सुरू झाली आहे आणि १३ सप्टेंबर २०२१ पर्यंत चालणार आहे.

SSC GD Recruitment 2021 : Ssc मार्फत २५,२७१ जागांसाठी मेगा भरती १० वी पास असलेल्यांना नोकरी संधी

न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने जाहीर केलेल्या नोटिफिकेशनुसार फिटरची ३० पदे, टर्नरची ०४पदे आणि मशिनिस्टच्या ०४ पदांवर भरती केली जाणार आहे. तसेच इलेक्ट्रीशियनच्या ३० आणि इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकच्या ३० पदांची भरती केली जाणार आहे. त्याचबरोबर वेल्डरची ०४ पदे आणि कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंटची ०५ पदे भरले जाणार आहेत.

ट्रेड अपेंटिसच्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करा ट्रेड अप्रैटिसच्या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाची वेबसाइट http://www.apprenticeship.org/ fonal www.apprenticeship.gov.in वर स्वतःची नोंदणी करावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here