Mumbai Building Collapse: इमारत कोसळून ११ जणांचा मृत्यू; सात जखमी

Mumbai Building Collapse

Mumbai Building Collapse: मुंबईच्या मालाडमध्ये रहिवासी इमारत कोसळून ११ जणांचा मृत्यू झाला आहे. पश्चिमेला असणाऱ्या न्यू कलेक्टर कंपाऊंड येथे ही दुर्घटना घडली आहे.

चारमजली इमारत शेजारच्या घरांवर कोसळली असल्याची माहिती मिळाली यानंतर आसपासच्या इमारतींमधील रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरु असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली असून मृतांच्या संख्या वाढण्याची भीती आहे.

बुधवारी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झालं असतानाच मालाडच्या मालवणीमध्ये रात्रीच्या सुमारास ही इमारत कोसळली. इमारत शेजारी असणाऱ्या घरांवर कोसळली असून अग्निशमन दलाकडून घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे.

नवनीत कौर राणा यांची खासदारकी धोक्यात जात प्रमाणपत्र हाय कोर्टाकडून रद्द

या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. ढिगाऱ्याखाली काहीजण दबले असल्याची भीती असून मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे.

स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य करत जखमींना कांदिवलीमधील रुग्णालयात नेण्यात आलं होतं. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार,१७ जखमींना आणण्यात आलं होतं. यामधील नऊ जणांचा मृत्यू झाला होता. इतर आठ जणांवर उपचार सुरु होते.रात्री ११ वाजून १० मिनिटांनी ही दुर्घटना घडली. पोलीस आणि अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी असून बचावकार्य सुरु आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here