iPhone 13,Apple iPad 2021 आणि iPad mini लॉच, पाहा फीचर्स

iPhone 13 series launch

Apple Event iPhone 13 launch: कंपनीच्या चहात्यांसाठी आजचा दिवस खास ठरला. Apple कंपनीने आज झालेल्या व्हर्चुअल इव्हेंटमध्ये iPhone 13 सीरीजसह ipad, iPad mini, iPhone 13 Pro, Pro Max, iPhone 13, iPhone 13 mini, Apple Watch Series 7 इत्यादी प्रोडक्ट लॉन्च केले.

आयपॅड आजपासून Apple.com/store वर आणि अमेरिकेसह 28 देशांमध्ये Apple Store अॅपवर ऑर्डर करण्यासाठी उपलब्ध आहे. आयपॅडचे वाय-फाय मॉडेल 30,900 रुपयांपासून आणि वाय-फाय + सेल्युलर मॉडेल 42,900 रुपयांपासून सुरु होईल IPad साठी स्मार्ट कीबोर्ड 13,900 रुपयांना स्वतंत्रपणे खरेदीसाठी उपलब्ध आहे. आयपॅडसाठी स्मार्ट कव्हर ब्लॅक, व्हाईट आणि इंग्लिश लव्हेंडरमध्ये 3,500 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

अॅपल आयपॅड मिनीमध्ये आता बॅक कॅमेरा 12 एमपीचा देण्यात आला असून जो 4K मध्ये रेकॉर्ड करु शकणार आहेत. तर फ्रंटला आयपॅडला 12 एमपी अल्ट्रा-वाइड कॅमेरा आहे. तसेच स्टीरिओसह नवीन स्पीकर सिस्टम देखील देण्यात आली आहे. स्मार्ट Folioचा एक नवीन सेट देण्यात येइल

iPad mini Specifications

iPad मिनी मध्ये 8.3 इंचाची टच स्क्रिन देण्यात आली असून वरच्या बटण म्हणून टच आयडीसह देण्यात आला आहे. मागील जनरेशनच्या आयपॅड मिनीच्या तुलनेत सीपीयूच्या परफॉर्मन्स 40 टक्क्यांनी तर जीपीयूच्या कामगिरीमध्येही सुधारणा झाली आहे. iPad mini बे A13 बायोनिक चिपसेट वर चालेल. iPad मिनीमध्ये आता USB-C पोर्ट देण्यात आला आहे आपण आता हे आपल्या कॅमेरा, लॅपटॉप, इतर कोणत्याही डिव्हाइसशी सहज कनेक्ट करू शकता. तसेच हे 5G ला सपोर्ट करतो.

Ipad 2021

Apple चे iPad 2021 नवीनतम A13 बायोनिक चिपसेट चालते. त्याच्या तळाशी एक बटण देण्यात आले आहे. आयपॅडमध्ये 112 डिग्री पॉइट व्ह्यू सहा 12 एमपी अल्ट्रा- वाइड कॅमेरा देण्यात आला आहे. फ्रंट कॅमेरा हा सेंटर-स्टेज फोकस फीचर्ससह देण्यात आला आहे ज्यामुळे कॉल करणे अधिक सोपे होणार आहे करेल आणि इतर वापरकर्त्यांना ऑटोमॅटीकली शोध घेईल. हे फस्ट जनरेशन Apple पेन्सिलला सपोर्ट करेल.

Apple watch सीरीज 7

या इव्हेंटमध्ये Apple WatchApple Watch सीरीज 7 लॉच होणार आहे. यामध्ये लहान बेजल्स आणि फ्लॅट-एज अशा दोन डिझाइनसह ही लाँच केले जाऊ शकते. तसेच, त्यात एक छोटी S7 चिप दिली जाईल, ज्यामुळे मोठ्या बॅटरीसाठी अधिक जागा मिळेल. हा चिपसेट तैवानच्या ASE तंत्रज्ञानाद्वारे बनवला जाईल. तसेच या मध्ये अनेक नवीन वॉच फेसेस पाहायला मिळू शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here