Ganesh Chaturthi 2021 : जाणून घ्या गणपती स्थापनेचा मुहूर्त ,गणपती स्थापणेनिमित्तअशा द्या शुभेच्छा

Ganesh Chaturthi 2021 : जाणून घ्या गणपती स्थापनेचा मुहूर्त ,गणपती स्थापणेनिमित्तअशा द्या शुभेच्छा

भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाची गणेश चतुर्थी देशभरात उत्साहात साजरी केली जाते. यावर्षी गणेश चतुर्थी 2021 चा उत्सव आजपासून म्हणजेच 10 सप्टेंबरपासून सुरु होत आहे. या दिवशी लोक आपल्या घरात गणपती बाप्पाला स्थापन करतात.

गणपती स्थापनेची शुभ मुहूर्त
10 सप्टेंबर 2021 रोजी, शुक्रवारी गणेश चतुर्थी सण आहे. या दिवशी जर तुम्ही शुभ मुहूर्तावर गणपतीची स्थापना केली तर ते तुमच्यासाठी खूप फलदायी ठरेल. पूजेचा शुभ मुहूर्त दुपारी 12:17 ते रात्री 10 पर्यंत असेल. त्यामुळे तुम्ही 10 सप्टेंबरला रात्री 12 नंतर कोणत्याही वेळी गणपतीची स्थापना आणि पूजा करु शकता.
यावर्षी अन्नत चतुर्दशी 19 सप्टेंबर 2021 रोजी साजरी केली जाईल. या दिवशी गणपतीला निरोप दिला जातो. या वर्षी चतुर्दशी तिथी 19 सप्टेंबर पासून सुरु होईल आणि 20 सप्टेंबर पर्यंत असेल.

NIACL Recruitment 2021 : न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनीमध्ये 300 जाागा, पदवीधारकांना संधी

विसर्जनाचा शुभ मुहूर्तही जाणून घ्या-
सकाळचा मुहूर्त – 7:39 ते 12:14 पर्यंत
दिवसाचा मुहूर्त – दुपारी 1:46 ते दुपारी 3:18 पर्यंत
संध्याकाळचा मुहूर्त – संध्याकाळी 6:21 ते रात्री 10:46
रात्रीचा मुहूर्त – रात्री 1:43 ते 3:11 (20 सप्टेंबर)
सकाळचा मुहूर्त – सकाळी 4:40 ते सकाळी 6:08 (20 सप्टेंबर)

दहा दिवस मन, वचन, कर्म आणि भक्तीने त्यांची पूजा केल्यानंतर अनंत चतुर्दशीला त्यांचे विसर्जन केले जाते.त्याचे आध्यात्मिक महत्त्व असे आहे की आपण दहा दिवस संयमाने जगले पाहिजे आणि दहा दिवसांनंतर आपल्या मनावर आणि आत्म्यावर स्थिरावलेल्या वासनांची मूर्तीसह नकारात्मकता विसर्जीत करून, शुद्ध मनाचे स्वरूप आणि आत्मा प्राप्त करावा.

आशा द्या गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा (Ganesh Chaturthi Wishes in Marathi)
1. “तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत,
सर्वांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य लाभो हीच
बाप्पाच्या चरणी प्रार्थना…

DCC Bank Recruitment 2021 : अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड मध्येे 100 जागांसाठी भरती

2. “हे गणराया संपूर्ण भारत देशात आलेल्या
कोरोनासारख्या भयानक रोगापासून तसेच इतर अडचणींतून
संपूर्ण देशाला मुक्त कर हीच तुझ्या चरणी प्रार्थना…
गणेश चतुर्थीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा.”

3. “मागच्या वर्षाचा अपूर्ण थाट होवो पूर्ण
बाप्पाच्या आगमनाने दुख दूर होवो,”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here