Akshay Kumar Mother Death: बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारला मातृशोक, आई अरुणा भाटिया(Aruna Bhatiya) यांचं निधन

Akshay Kumar Mother Death

अक्षय कुमार आपल्या आजारी आईला पाहण्यासाठी सोमवारी सकाळी ब्रिटेनहून शूटिंग सोडून मुंबईत परतला होता.बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या (Akshay kumar) आईचं निधन झालं आहे. अभिनेत्यानं ट्वीट करुन ही निधनाची बातमी शेअर केली आहे. अक्षयची आई अरुणा भाटिया (Aruna Bhatiya) यांची प्रकृती खालावल्यानं त्यांना मुंबईतल्या हिरानंदानी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. आयसीयूमध्ये उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं आहे.

अक्षय कुमारचं ट्विट, ती माझी गाभा होती आणि आज मला माझ्या अस्तित्वाच्या मुळाशी असह्य वेदना जाणवते. माझी आई श्रीमती अरुणा भाटिया आज सकाळी शांतपणे या जगाचा निरोप घेऊन माझ्या वडिलांसोबत दुसऱ्या जगात परत आली. मी आणि माझे कुटुंब या वेदनेतून जात असल्याने मी तुमच्या प्रार्थनांचा आदर करतो. ओम शांती अक्षय कुमार लंडनमध्ये सिनेमाचं शूटींग करत होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here