नीरज चोप्राचा(Neeraj Chopra) सन्मान! ज्यादिवशी गोल्ड जिंकलं आता तो दिवस असणार Javelin Throw Day

afi announced 7th august as javelin throw day as neeraj chopra won gold medal in tokyo olympic 2020 on that day

टोकयो ऑलिम्पिक 2020 (Tokyo Olympic 2020) स्पर्धा नुकती पार पडली.भालाफेक या क्रीडा प्रकारात भारतीय खेळाडू नीरज चोप्राने (Neeraj Chopra) इतिहास रचत सुवर्ण पदक पटकावले. जगभरातून त्याचं कौतुक होत आहे, दरम्यान त्याचा एक अनोखा सन्मान करण्यात आला आहे.

टोकयो ऑलिम्पिक 2020 (Tokyo Olympic 2020) स्पर्धा नुकती पार पडली. या स्पर्धेत भालाफेक (Javelin Throw) या क्रीडा प्रकारात भारतीय खेळाडू नीरज चोप्राने (Neeraj Chopra) इतिहास रचत सुवर्ण पदक (Gold Medal) पटकावले.

अॅथलेटिक्स प्रकारात भारताला प्रथमच सुवर्णपदक मिळाल्यानं नीरज चोप्रावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सुवर्ण पदक विजेत्या नीरज चोप्राचा विविध पुरस्कारांनी ठिकठिकाणी सन्मान केला जात आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय ॲथलेटिक्स महासंघाच्या (Federation of Indian Athletics) समितीनं एक मोठा निर्णय घेतला आहे.

भारतात आता दरवर्षी 7 ऑगस्ट हा दिवस भालाफेक दिन म्हणून साजरा करण्यात येईल अशी घोषणा केली आहे. नीरज चोप्राने टोकयो ऑलिम्पिक 2020 मध्ये 7 ऑगस्टला भालाफेकीच्या अंतिम सामन्यामध्ये सुवर्णपदक पटकावले.

Tokyo Olympics 2021 : ऑलिम्पिकमध्ये भारताने रचला इतिहास,जर्मनीला 5-4 ने हरवून 41 वर्षाने हॉकीमध्ये मिळवले पदक

यासोबतच विविध क्रीडा प्रकारात भारतीय खेळाडूंनी यश मिळवले. त्यानिमित्ताने टोकयो ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या भारतीय ट्रॅक अँड फिल्ड अॅथलिट्सच्या सत्कार समारंभाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.

देशातील जास्तीत जास्त युवा खेळाडू भालाफेक या क्रीडा प्रकाराकडे आकर्षित व्हावे, या उद्देशाने भारतीय अॅथलेटिक्स महासंघाने 7 ऑगस्ट हा दिवस भालाफेक दिन म्हणून साजरा करण्यात येईल अशी घोषणा केली आहे. याबाबतची माहिती भारतीय अॅथलेटिक्स महासंघाच्या योजना आयोगाचे अध्यक्ष ललित भनोत यांनी या समारंभात दिली. नीरज चोप्राने या घोषणेचे स्वागत केले असून, हा सन्मान मिळाल्यानं मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो, अशी प्रतिक्रिया यावेळी बोलताना त्याने व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here